Tuesday, June 25, 2024

दिलदार! सलमान खानने घेतली वृद्ध महिलेची भेट, ‘भाईजान’च्या व्हिडिओने जिंकली सर्वांची मने

‘भाईजान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानला (Salman Khan) आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याचे चाहते केवळ देशातच नाहीत, तर जगभरात आहेत. सलमान सध्या आपल्या ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ (Antim: The Final Truth) या चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. आपण सर्वांनी सलमानच्या चांगल्या कामांचे किस्से अनेकदा ऐकले असतील. असे म्हणतात की, जो व्यक्ती सलमानला आवडतो, त्या व्यक्तीसाठी सलमान काहीही करायला तयार असतो. त्याने आतापर्यंत अनेकांची मदत केली आहे. त्यामुळेच कदाचित अभिनेता प्रत्येक वयाच्या व्यक्तींवर भरभरून प्रेम करतो. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वृद्ध महिलेसाठी सलमानचा आदर पाहून चाहते त्याची प्रशंसा करत आहेत.

सलमान खानचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडिओत एक वृद्ध महिला सलमानकडे जाते, तेव्हा त्या महिलेचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती सलमानला आशीर्वाद देताना दिसत आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सलमान आपल्या ‘अंतिम’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगमधून परतत असताना एका वृद्ध महिलेशी त्याची भेट झाली. (Actor Salman Khan Respect For Old Lady Will Win Fans Heart Watch Video)

या पोस्टवर चाहते सलमानच्या वर्तणाचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओत सलमानचा बॉडीगार्ड शेराही दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ४० हजारांपेक्षाही अधिक लाईक्सही मिळाले आहेत. सलमानच्या या अंदाजावर खुश होत चाहत्याने लिहिले आहे की, “दयाळू माणूस, म्हणूनच मी त्याच्यावर प्रेम करतो.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “मॅन विथ गोल्डन हार्ट, सुपरस्टार सलमान खान.” याव्यतिरिक्त आणखी एका चाहत्याने लिहिले की, “भाईला स्टार असल्याचा अजिबात अभिमान नाही, म्हणूनच सर्वजण त्याच्यावर प्रेम करतात.”

तब्बल दोन वर्षांनंतर सलमान खान रुपेरी पडद्यावर परतला आहे. ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमानची बहीण अर्पिताचा पती आयुष शर्मा आणि टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी महिमा मकवाना यांची जोडी दिसत आहे. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन, तर स्वत: सलमान खानने चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या यशस्वी मराठी चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यामध्ये सुपरस्टार सलमान खान एका शीख पोलिसाची भूमिका साकारत आहे.

हे देखील वाचा