Tuesday, June 18, 2024

सलमान खानने साबरमती आश्रमात पोहचून चालवला चरखा, त्याच्या अंदाजने जिंकले नेटकऱ्यांची मने

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून, चाहत्यांनाही सलमानची नवी स्टाईल आवडली आहे. ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी सलमान सध्या अहमदाबादमध्ये आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तो साबरमती येथील महात्मा गांधी आश्रमात पोहोचला. जिथे त्याने चरखाही चालवला. सलमानचा गांधी आश्रमातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अहमदाबादच्या गांधी आश्रमातून सलमानच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये तो चरखा फिरवताना दिसत आहे.

आपल्या देसी अंदाजासाठी ओळखला जाणारा सलमान खान नेहमीच हटके गोष्टी करताना दिसतो. आता देखील तो काहीतरी वेगळे करताना दिसला आहे. सलमान चक्क चरखा फिरवताना दिसला. मोठ्या उत्साहाने त्याने चरखा फिरवला असून, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधानाने परिपूर्ण हास्य दिसत आहे. सलमानचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच कमी काळात तुफान व्हायरल झाले आहेत. त्याच्या या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोमध्ये सलमान बॉडीगार्ड शेरासोबत दिसत असून, त्याच्या आजूबाजूला खूप गर्दी आहे. त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

ज्या चरख्याने सलमान खानने सूत विणले आहे, त्याच चरख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक मान्यवरांनी सूत विणले आहे. आश्रमाच्या परंपरेनुसार सलमानचे स्वागत केले गेले आणि त्याला कापसाचा हार घातला गेला. सलमाननेही तो हार आपल्या मनगटात वेगळ्या पद्धतीने बांधला. त्याचे हे रूप त्याच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना सुखावून जात आहे.

तत्पूर्वी ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात सलमान, आयुष आणि महिमा मकवाना यांच्या प्रमुख भूमिका असून, महेश मांजरेकर यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘अंतिम’ने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर ५.०३ कोटी रुपये, शनिवारी ६.०३ कोटी रुपये आणि रविवारी ७.५५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये एकूण १८.६१ कोटींची कमाई केली असून, चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सलमान अजूनही चित्रपटाचे सतत प्रमोशन करत आहे. सिनेमाचे बजेट जवळपास ३५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा