Thursday, June 13, 2024

सलमान खानलाही ‘बार्बी’ची क्रेझ? अरबाजच्या पार्टीमध्ये अभिनेत्याच्या गुलाबी पॅंटने वेधले सर्वांचे लक्ष

नुकताच प्रदर्शित झालेला अमेरिकन चित्रपट ‘बार्बी‘ हा सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. भारतात देखील या चित्रपटाचे जोरदार स्वागत करण्यात आले. सामान्य माणसांपासून ते बाॅलीवूड मधील कलाकारांनी हा चित्रपट बघितला आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कपड्यांची स्टाईल चाहत्यांना खूप आवडले. या चाहत्यांच्या यादीत हिंदी सुपरस्टार सलमान खान पाहायला भेटला.

बाॅलिवूड अभिनेता अरबाज खानने ४ ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे ग्रैंड सेलिब्रेशन करण्यात आले यामध्ये त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अरबाज खानची बहीण अर्पिता आणि मेव्हना आयूष शर्मा तर, बाॅलीवूड भाईजान सलमान खान (Salman Khan) वेगळ्या अंदाजमध्ये दिसून आला. पार्टीमध्ये सलमान खानने गुलाबी रंगाची पॅंट घातली होती. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

अरबाज खानच्या पार्टीमध्ये बाॅलीवूड सुपरस्टार सलमान खानने सर्वांचे लक्ष वेधले होत. त्यावेळी ताे राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि गुलाबी रंगाची पॅंट अशा पेहरावात दिसला. या लूकमध्ये तो हैंडलम दिसत होता. परंतु, याच लूकमूळे तो चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येेत आहे. सलमान खानने हा लूक ‘बार्बी’ (Barbie) या चित्रपट पाहून केला आहे, असे सोशल मीडियावर बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सलमान खानने घातलेली गुलाबी रंगाची पॅंट पाहून लोकांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याची संधी मिळली आहे. एका यूजरने लिहीले की, “सलमान भाईचे हैंगओवर अजून नाही उतरले…”, दूसऱ्या यूजरने लिहीले की, “भाईला बार्बी फीवर झालाय.” त्याचा हा लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Actor Salman Khan’s pink pants caught everyone’s attention at Arbaaz Khan’s party)

अधिक वाचा- 
आजारपणाच्या नावाखाली सामंथाने तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीने पोस्ट करून दिली माहिती
आख्या जगाच लक्ष वेधनाऱ्या सीमा-सचिनवर आलं नविन गाणं; पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा