Thursday, June 13, 2024

आजारपणाच्या नावाखाली सामंथाने तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीने पोस्ट करून दिली माहिती

साउथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. पण आता अभिनेत्रीने सिनेमातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सामंथाला मागील वर्षी मायोसिटिस नावाचा आजार झाल्याची माहिती तिने दिली होती. त्यानंतर तिने करिअरमधून ब्रेक घेतला आहे. पण आता सामंथा बदल अशी अफवा पसरवली आहे ती संतापली आहे.

झालं असं की, अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)मायोसिटिस या आजाराने त्रस्त आहे. यांवर ती उपचार देखील घेत आहे. पण या दरम्यान अशी अफवा पसरत आहे की, सामंथा ने एका तेलगू सुपरस्टारकडून मायोसिटिसच्या उपचारासाठी 25 कोटींची आर्थिक मदत घेतली आहे.हे वृत्त काही दिवसांपासून व्हायरल होत आहे.

 आता अभिनेत्रीने या सर्वावर प्रतिक्रिया दिली आहे, ती म्हणते “मायोसिटिसच्या उपचारासाठी 25 कोटी!? कोणीतरी ही अफवा पसरवली आहे. माझ्या कारकिर्दीत मी खूप काम केले आहे .मला चांगले मानधन मिळाले आहे,त्यामुळे, मी सहजतेने माझी काळजी घेऊ शकते. धन्यवाद.मायोसोटिस ही एक अशी स्थिती आहे ज्याने हजारो लोक त्रस्त आहेत. कृपया उपचाराबाबत आम्ही जी माहिती दिली आहे त्याबाबत आपण जबाबदार राहू या.” तिने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी समंथा कामातून ब्रेक घेतला आहे. तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने अभिनयातून सहा महिने थांबण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री लवकरच यूएस मध्ये तिच्या ऑटोइम्यून कंडिशन मायोसिटिसवर उपचार घेणार आहे . ती सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या अपडेट्स देत असते. प्रथम, तिने वेल्लोरच्या सुवर्ण मंदिरात दैवी देवीचे आशीर्वाद घेतले, ईशा योग केंद्रात सद्गुरूंसोबत योगासन केले आणि नंतर बालीमध्ये सुट्टीचा आनंद लुटला.(actress samantha ruth prabhu reacts to rumors of taking 25 crores for treatment from a telugu superstar)

अधिक वाचा- 
अतिशय आलिशान जीवन जगते अभिनेत्री काजोल, कोट्यवधींच्या गाड्या, लाखोंच्या साड्यांचे आहे चांगले कलेक्शन
एकेकाळी ‘या’ हिट चित्रपटांना काजोलने दिला होता नकार, आज नक्कीच होत असेल पश्चाताप

हे देखील वाचा