जेव्हाही नव्वदच्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्यांची चर्चा होते, तेव्हा त्यांच्यात संजू बाबा अर्थातच संजय दत्त याचा समावेश होतोच होतो. संजय दत्त याने नायकाची भूमिका साकारलीच, पण त्यासोबतच त्याने खलनायक साकारून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थानही निर्माण केले. त्याच्या सिनेमांविषयी एक खास बाब अशी की, तो जे सिनेमे करतो, त्या सिनेमातून त्याला प्रसिद्धी मिळते. मात्र, सिनेमात त्याचे मित्र बनलेले कलाकारांचे पात्रही चाहत्यांच्या मनात कायमचे घर करून जातात. असाच एक अभिनेता आहे, ज्याने संजय दत्तच्या ‘वास्तव’ या सिनेमात त्याच्या मित्राची भूमिका साकारली होती. या सिनेमात त्याने रघूचा मित्र ‘देढ़ फुटिया‘ हे पात्र साकारले होते.
सन १९९९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वास्तव’ या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) याने रघु ही भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत या सिनेमातील आणखी एक गाजलेली भूमिका म्हणजे, डेढ़ फुटियाची. हे पात्र मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी साकारले होते. सध्या संजय नार्वेकर हे हिंदी सिनेमापासून दूर आहेत. ते मराठी सिनेमांमध्ये काम करताना दिसतात. त्यांचा लूक पूर्णपणे बदलला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून वाढत्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकता. संजय नार्वेकरांचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोत त्यांची वाढलेली पांढरी दाढीही दिसत आहे.
View this post on Instagram
संजय नार्वेकरांच्या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्स
संजय नार्वेकरांनी हिंदी सिनेसृष्टीत मोठमोठ्या भूमिका साकारल्या नसल्या, तरी त्यांनी ज्या भूमिका साकारल्या, त्यात जिवंतपणा आणला. सोशल मीडियावरही ते जास्त सक्रिय असतात. मात्र, ते जेव्हा कोणताही फोटो शेअर करतात, तेव्हा चाहते त्यांच्या कमेंट बॉक्सवर तुटून पडतात. त्यांच्या व्हायरल होत असलेल्या एका फोटोवर चाहत्याने लिहिले की, “तुमचा हा लूक एक नंबर आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “सर, तुम्ही लिजंड आहेत. तुम्ही वास्तव, इंडियन यांसारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत.”
View this post on Instagram
संजय नार्वेकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ते शेवटचे ‘टाईमपास ३’ या सिनेमात झळकले होते. सध्या ते ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत ते पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एवढा मोठा सुपरस्टार असूनही रस्त्याच्या मध्येच कार्तिकने साधला चिमुकल्या चाहत्याशी संवाद, व्हिडिओ व्हायरल
महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाने थिएटरमध्ये पूर्ण केले १०० दिवस, बजेटच्या तिप्पट छापला पैसा
लैंगिक अत्या’चार करणाऱ्यांच्या गळ्यात हार आणि तोंडात पेढे, जावेद अख्तरांनी ट्विटरवरच केली आगपाखड