Tuesday, June 18, 2024

अरुणाचल प्रदेशाच्या समारंभात पोहचला संजय दत्त; म्हणाला, ‘तुम्ही चांगली जागा दिलीत, मी तुरुंगातही राहिलो आहे’

बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तचे (sanjay dutt) इंडस्ट्रीत खूप नाव आहे आणि त्याची फॅन फॉलोविंग जगभरात आहे. एक काळ असा होता, जेव्हा संजयची प्रतिमा खूपच खराब झाली होती. त्याचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. पण तुरुंगातून सुटल्यानंतर संजयमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांमुळे त्याची प्रतिमा पुन्हा उंचावली आणि आता त्याचे परिणाम त्याला मिळाले आहेत, हे नाकारता येणार नाही. अरुणाचल प्रदेशच्या नामकरणाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त संजयची राज्याचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. अभिनेत्याने अरुणाचल प्रदेश सरकारचेही आभार मानले आहेत.

“अपुन को बहुत बहुत खुशी हुई है, के अपुन अरुणाचल प्रदेश का ब्रांड एंबेसडर है मामू और अपुन ये राज्य कभी छोड़ के नई जाने वाले” असे संजय बोलला आहे. अलीकडेच तो अरुणाचल प्रदेशचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून मेचुका येथे पोहोचला होता. अरुणाचल प्रदेशच्या ५० व्या वर्धापन समारंभात सहभागी झालेला संजय म्हणाला, “मी तुम्हाला सांगतोय, मला इथे बांधा. तुमचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे.”

राज्यातील अभिनेत्यासाठी योग्य निवास व्यवस्था उपलब्ध करून देऊ न शकल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या माफीनाम्याला गंमतीने उत्तर देताना संजय म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो की, मी सहा वर्ष तुरुंगात राहिलो आहे…त्यापेक्षा चांगली जागा तर तुम्ही मला दिली आहे.”

अनेक प्रोजेक्ट्सचा भाग आहे संजय दत्त
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर संजय दत्त दरवर्षी अधिकाधिक चित्रपट करण्यासाठी ओळखला जातो. आता तो क्वचितच मुख्य भूमिकेत दिसत असला, तरी त्याला चांगल्या सहाय्यक भूमिका मिळत आहेत. अभिनेत्याच्या शेवटच्या काही चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर त्यात ‘तोरबाज’, ‘भुज’, ‘सडक २’ आणि ‘पानिपत’ या चित्रपटांचा समावेश आहे दुसरीकडे, अभिनेत्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘पृथ्वीराज’, ‘शमशेरा’, ‘केजीएफ चॅप्टर २’ आणि ‘द गुड महाराजा’ यांसारख्या चित्रपटांचा भाग असेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा