Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मोहब्बतें’ चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण, यश राज फिल्मसने शेअर केली पोस्ट

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान, लाेकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा रोमँटिक चित्रपट ‘मोहब्बतें‘ 27 ऑक्टोबर 2000 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात उदय चोप्रा, शमिता शेट्टी, जुगल हंसराज, किम शर्मा, जिमी शेरगिल आणि प्रीती झांगियानी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. आदित्य चाेप्रा दिग्दर्शित या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त यशराज फिल्म्स साजरा करत आहे.

यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याला कॅप्शन दिले, “22 वर्षांपूर्वी जेव्हा मिस्टर राज आर्यन मल्होत्रा ​​आले आणि आम्हाला ‘प्रेम कसे होते’ हे शिकवले. आज मोहब्बतें चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

चाहत्यांनी कमेंट आणि लाईक करत केला प्रेमाचा वर्षाव
यशराज फिल्म्सच्या या पोस्टवर सोशल मीडिया युजर्स जोरदार कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “हा चित्रपट आणि त्यातील गाणी सर्व सुपर आहे.”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, “मोहब्बतेंसारखा कोणताही चित्रपट हृदयाच्या जवळ असू शकत नाही.” अनेक यूजर्स याला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

शमिता शेट्टीचेही खूप कौतुक होत आहे. त्याचवेळी यशराज फिल्म्सने आणखी एक डायलॉग शेअर करून सिनेप्रेमींची मने जिंकली आहेत.’मोहब्बतें’ चित्रपटातील गाणी आणि संवाद आजही प्रेक्षकांना खूप आवडतात. या चित्रपटापूर्वी शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय ‘जोश’ चित्रपटात एकत्र दिसले होते.

चित्रपटाची स्टाेरी
या चित्रपटात गुरुकुल कॉलेजचे कडक प्राचार्य नारायण यांची स्टाेरी आहे, ज्याची मुलगी मेघा कॉलेजमधील संगीत शिक्षकाच्या प्रेमामुळे आत्महत्या करते. या चित्रपटाची कथा गुरुकुलातील तीन विद्यार्थी आणि त्यांच्या प्रेम जीवनाभोवती विणलेली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तापसीने पुन्हा केला पॅपराझींचा सामना; यावेळी रागाने म्हणाली, ‘असे करू नका’

बाबाे! उंटांमध्ये शूटिंग करताना अमिताभ बच्चन झाले होते जखमी, बिग बींनी खुद्द केला खुलासा

हे देखील वाचा