×

‘मोहब्बतें’मधील जिमी शेरगीलच्या अभिनेत्रीचा पूर्ण बदललाय लूक, आता दिसते ‘अशी’

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट होऊन गेले ज्यांची चर्चा आजही केली जाते. या चित्रपटांची कथा, गाणी सगळ्याच गोष्टींची चर्चा होत असते. असाच गाजलेला चित्रपट म्हणजे ‘मोहब्बते’. ‘मोहब्बतें’ चित्रपट पाहिला नाही असे खूप कमी लोक पाहायला मिळतात. प्रत्येकाला या चित्रपटाने वेड लावले होते. याच चित्रपटाच्या एका अभिनेत्री विषयी आज जाणून घेणार आहोत.

‘मोहब्बतें’ चित्रपटाने हिंदी चित्रपट जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली. चित्रपटातील गाणी, डायलॉग सगळेच प्रचंड गाजले. चित्रपटाची २२ वर्ष पूर्ण होत आहेत. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागताच प्रत्येकजण पाहतो. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. ज्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), शाहरुख खान (Shahrukh Khan) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर त्यांच्यासोबत

(jimmy Sheirgill), शमिता शेट्टी (Shamita Shetty), उदय चोप्रा (Uday Chopra) आणि प्रिती झंगियानी  (Preeti Jhangiani) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. बाकीचे कलाकारही लोकप्रिय ठरले. मात्र त्या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारी प्रिती आता मात्र खूप बदलली आहे.

View this post on Instagram

A post shared by Preeti Jhangiani (@jhangianipreeti)

प्रिती झंगियानी सध्या सोशल मिडियावर सतत सक्रिय असते. ती नेहमी आपले नवनवीन फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोची नेहमीच चर्चा होत असतेे. त्या चित्रपटामधील साधी प्रिती आता खूपच स्टायलिश वाटत आहे. सोबतच शिमरी लाल साडीमध्ये तिला ओळखणे फार कठीण आहे.

View this post on Instagram

A post shared by Preeti Jhangiani (@jhangianipreeti)

 

तिचे चाहते हे फोटो पाहून माझा विश्वासच बसत नाही, अशी प्रतिक्रिया देत आहेत. प्रितीने मोठ्या पडद्यावर जास्त काम केले नाही. तिने २००० साली ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर २००२ मध्ये ‘आवारा पागल दिवाना’ मध्ये ती दिसली होती. यानंतर ती २००३ मध्ये ‘बाजा’ चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये ती प्रितीच्या भूमिकेत दिसली होती. तिचा बदललेला लूक पाहून चाहतेसुद्धा थक्क होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Preeti Jhangiani (@jhangianipreeti)

तिच्या अभिनयाचे आणि घायाळ करणार्‍या सौंदर्याने अनेक चाहते आहेत. जे तिला तुम्ही खूपच छान दिसत आहात, असे म्हणत आहेत. ‘मोहब्बतें’ चित्रपटाने तिला खास ओळख मिळवून दिली. आता तिच्या सोशल मीडियावर झळकणाऱ्या फोटोंनी पुन्हा एकदा तिच्या या चित्रपटांची चाहत्यांना आठवण करून दिली आहे.

हेही वाचा –

Latest Post