बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) नाव जेव्हा मनात येते, तेव्हा अनेकदा शाहरुखची रोमँटिक स्टाईल आठवते. तसे, शाहरुख खानचे करोडो लोक चाहते आहेत. शाहरुख खान केवळ भारतीयच नाही, तर परदेशातील लोकांनाही आवडतो. शाहरुख खानची फॅन फॉलोविंग इतकी प्रचंड आहे की, बाहेरचे लोकही त्याचा वाढदिवस खूप चांगल्या पद्धतीने साजरा करतात. यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.
सामान्य मुलींसोबतच अनेक बॉलिवूड अभिनेत्री देखील शाहरुखसाठी वेड्या आहेत. इतकेच नाही, तर एक काळ असा होता जेव्हा या अभिनेत्रींचा क्रश शाहरुख खान देखील असायचा. चला तर मग जाणून घेऊया त्या अभिनेत्रींबद्दल ज्यांनी रोमान्स किंगला आपले मन दिले.
करीना कपूर
या यादीत करीना कपूरच्या (Kareena Kapoor) नावाचाही समावेश आहे. करीना कपूरने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, ती शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे आणि तिला त्याच्यासोबत काम करायचे आहे. त्यानंतर दोघांनीही एकत्र काम केले, त्यांचे काम खूप पसंत केले गेले.
विद्या बालन
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिला शाहरुख खान खूप आवडायचा. विद्या बालन म्हणाली होती की, जेव्हा ती किंग खानला पहिल्यांदा भेटली होती, तेव्हा त्याला पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. “शाहरुख खान खूप मोहक मुलगा आहे. मला शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाली तर मी नक्की करेन.” असेही ती म्हणाली.
चित्रांगदा सिंग
चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) शाहरुख खानसोबत काम करत होती. बॉलिवूडमध्ये काम करण्याआधीही शाहरुख खान छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करायचा, तेव्हापासून चित्रागंदा सिंगला शाहरुख खान आवडायचा.
शाहरुख खान २०१८ साली ‘जीरो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्माही दिसल्या होत्या. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर शाहरुख खान कोणत्याही चित्रपटात दिसला नाही आणि आता तो थेट ‘पठाण’मध्ये दिसणार आहे. ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख खान साऊथ डायरेक्टर एटली आणि राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटातही दिसणार आहे. मात्र, या चित्रपटांची अधिकृत घोषणा झालेली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –










