Friday, March 31, 2023

राडाच! शाहिद कपूरचा भावासाेबत जबरा डान्स, व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकतील

शाहिद कपूर आणि ईशान खट्टर हे बॉलिवूडमधील शानदार भावांपैकी एक आहेत. अनेकदा त्यांचे मस्ती करत असतानाचे फाेटाे आणि व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत असातात. त्या दाेघांची जाेडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशातच शनिवारी (दि. 1 ऑक्टाेंबर) शाहिद आणि ईशानने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत असून चाहते व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

शाहिद (Shahid Kapoor) आणि ईशान (Ishaan Khatter) याने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “पीजेमध्ये एमजे.” व्हिडिओमध्ये दोन्ही भाऊ मायकल जॅक्सनच्या स्मूथ क्रिमिनल गाण्यावर नाचताना दिसत आहेत. यात दाेघांनीही पायजमा घातला आहे. व्हिडिओमध्ये त्यांची आई नीलिमा अजीमही दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

ईशान खट्टरने त्याच्या पाेस्टवर कमेंट करत लिहिले, “मॉम इन बैक बीइंग क्यूटेस्ट.” दुसर्‍या कमेंटमध्ये त्यांनी लिहिले, “जम्मा जम्मा पाजाम्मा.” दाेघा भावांच्या या व्हिडिओवर भरपूर लाेकांचे कमेंट येत आहे. या व्हिडिओवर अभिनेता कुणाल खेमूने देखील कमेंट केले आहे. कुणालने इमाेजी शेअर करत लिहिले, “खूप छान मुला..पुढच्या वेळी मी तुम्हाला मून वाॅक शिकवणार.”

त्याच्या पाेस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. त्यातील एकाने लिहिले, “आम्ही सर्व तुमच्या दाेघांची जाेडी रुपेरी पडद्यावर बघू इच्छिताे.” तेथेच बाकी चाहत्यांनी हसण्याचे, हार्ट आणि फायर इमाेजी कमेंट सेक्शन मध्ये टाकले आहे. शाहिद कपूर आणि ईशार खट्टर अनेकदा साेबत पाेस्ट शेअर करतात. नुकतेच शाहिदने भाऊ ईशान आणि कुणाल खेमूसह अन्य मित्रांसाेबत पार्टी करत असताना व्हिडिओ शेअर केला हाेता. व्हिडिओला शेअर करत शाहिदने लिहिले, “पार्टी.”

काही आठवड्यापूर्वी शाहिदने भाऊ ईशानसाेबत फॅमिली गॅदरिंगचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला हाेता, ज्यात दाेघे भाऊ ‘प्यार मेरा दिवाणा’ या गाण्यावर नाचताना दिसले हाेते. व्हिडिओ शेअर करत शाहिदने लिहिले, “हे आम्हाला आमच्या मामा नीलिमा अजीम यांच्याकडून मिळाले आहे.”

शाहिद कपूर याच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर शाहिद कपूर अखेरचा ‘जर्सी’ चित्रपटात दिसला होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘बिग बॉस 16’मध्ये येणार वादळ! दोन नवीन स्पर्धकांची झालीय एन्ट्री; एक पॉलिटिशन, तर दुसरा रॅपर

घटस्फोटाच्या बातम्यांमध्येच दीपिका अन् रणवीरची ‘तसली’ चॅट आली समोर, तुम्हीही वाचाच

हे देखील वाचा