सिनेमा फ्लॉप, पण पठ्ठ्या सुसाट! शाहिद कपूरने मानधनात केली ५ कोटींची वाढ, आधी घ्यायचा ‘इतके’ कोटी

जेव्हा एखादा कलाकार एखादा सुपरहिट किंवा ब्लॉकबस्टर सिनेमा देतो, तेव्हा तो त्याच्या मानधनात वाढ नक्कीच करतो. जर त्याने सलग सुपरहिट सिनेमे दिले, तर तो म्हणेल ती रक्कम निर्माते त्याला देण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, जर सिनेमा सपशेल फ्लॉप होऊनही एखादा अभिनेता त्याचे मानधन वाढवत असेल, तर…? असाच एक बॉलिवूड अभिनेता आहे, ज्याने आपला सिनेमा फ्लॉप होऊनही कोट्यवधी रुपये मानधन वाढवले आहे.

हा अभिनेता इतर कुणी नसून बॉलिवूडच्या हँडसम हंक अभिनेत्यांमध्ये सामील असलेला शाहिद कपूर (Shahid Kapoor) आहे. शाहिद नेहमीच त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. नुकताच त्याचा आणि पत्नी मीरा कपूर (Mira Kapoor) हिचा लिपलॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो शेवटचा ‘जर्सी’ (Jersey) या सिनेमात झळकला होता. त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नव्हता. मात्र, शाहिदच्या अभिनयाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले होते. अशातच असे वृत्त आले आहे की, शाहिदने आपल्या मानधनात (Shahid Kapoor Fees) वाढ केली आहे.

शाहिदच्या मानधनात वाढ
माध्यमांतील वृत्तानुसार, शाहिदने त्याच्या मानधनात ५ कोटी (Shahid Kapoor Increased 5 Crore Fees) रुपयांची वाढ केली आहे. विशेष म्हणजे, शाहिदने हे मानधन ‘जर्सी’ सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर वाढवली आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त २१ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, सिनेमाला ओटीटीवर प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती.

Latest Post