Monday, April 15, 2024

शाहरुख खानची मुलगी शेती करणार? सुहाना खानने महाराष्ट्रात खरेदी केली ‘इतक्या’ कोटींची जमीन

सुपरस्टार शाहरुखची लाडकी लेक सुहाना सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सुहाना सोशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सुहाना या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज‘ या वेबसिरीजमधून अभिनयाच्या जगात पदार्पण करणार आहे. सुहाना खान हिला आता प्रसिद्धीझोतात राहणे आवडते. सुहाना खान बॉलिवूडच्या आवडत्या स्टार किड्सपैकी एक आहे.

बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज असलेली सुहाना (suhana khan) बर्‍याचदा पार्टी, इव्हेंट किंवा इतर कोणत्याही फंक्शनमध्ये उपस्थित असते. प्रत्येक वेळी ती तिच्या उत्कृष्ट लूकने, ड्रेसिंग सेन्सने आणि तिच्या ग्लॅमरस शैलीने चाहत्यांना आश्चर्यचकीत करते. सुहाना तिच्या ग्लॅमरस लूक आणि हाॅट फिगरने चाहते घायाळ करते. सुहानाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, सुहानाने अली बागच्या थाल गावात जमीन खरेदी केली आहे. तिने दीड एकर जमिन खरेदी केल्याचे सांगितले जाते आहे. दीड एकरपैकी 2218 चौरस फुटांवर बांधकाम करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसून या जागेची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुहानाने खरेदी केलेली दीड एकर जमीन 12 कोटी 91 लाख रुपये आहे. या जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशी संबंधित नोंदणीही 1 जून रोजी झाल्याचे बोलले जात आहे. सुहानाने 77 लाख 46 हजार रुपये शुल्कही जमा केले आहे. अंजली, रेखा आणि प्रिया या तीन बहिणीं मिळून ही जमीन खरेदी केली आहे.

सुहाना खान विषयी बोलायचे झाले तर, चाहते सुहानाच्या पदार्पणाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहे. आता लवकरच सुहाना झोया अख्तरच्या ‘द आर्चीज‘ या वेबसिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ही मालिता OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. मात्र, या वेब सिरीजिची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. नुकताच या वेब सिरीजता ट्रेलर समोर आला आहे. ‘द आर्चीज’मधून सुहाना खान व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा देखील पदार्पण करत आहे. (Superstar shah rukh khan daughter suhana khan buys farm land alibaug for 12 91 crore)

अधिक वाचा- 
नम्रता मल्लची ग्लॅमरस स्टाईल पाहून ‘या’ गायकाचा सुटला धीर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘सीआयडी’ मालिकेतील इन्स्पेक्टर विवेकची सध्याची अवस्था पाहून बसेल धक्का!! तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही, पाहा… 

हे देखील वाचा