Friday, May 24, 2024

झीनत अमान यांनी कठीण दिवसांबद्दल केला खुलासा; म्हणाल्या,’माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा माझ्या फिगरमध्ये लाेकांना…’

झीनत अमान त्यांच्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या अभिनयाने आणि बोल्डनेसने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘यादों की बारात‘, ‘रोटी कपडा और मकान‘, ‘सत्यम शिवम सुंदरम‘, ‘डॉन‘ आणि ‘दोस्ताना‘ यांसारख्या अनेक शानदार चित्रपटांमध्ये दिसलेल्या झीनत अमान यानी नुकतेच एका बातचीतदरम्यान आपली व्यथा मांडली . काय म्हणाल्या झीनत अमान? चला, जाणून घेऊया…

झीनत अमान (zeenat aman) म्हणतात की, त्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात समजले की, चित्रपटसृष्टीत लोकांना सुंदर आणि तरुण महिला हव्या आहेत. अभिनेत्री म्हणाली, “इंडस्ट्रीतील हे वास्तव जाणून घेतल्यानंतर मी माझ्या लूकचा फायदा घेतला आणि त्याही वरच्या भूमिका मी निवडल्या. तरीही लोकांना माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा माझ्या चेहऱ्यावर आणि फिगरवर जास्त रस होता. हेच कारण आहे की, मला म्हातारे व्हायला आवडते.”

याशिवाय झीनत यांनी असेही सांगितले की, “त्यांना करिअरच्या सुरुवातीच्या काळात वाईट दिवस पाहावे लागले.” याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “मी उंचीसोबतच चढ-उतारही पाहिले आहेत. त्यामुळे मला जी काही लाज किंवा भीती वाटायची ती फार पूर्वीच निघून गेली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)

झीनत अमान पुढे म्हणाल्या, “माझ्या आयुष्याची व्याख्या काही दशकांपूर्वीच्या काही वाईट दिवसांनी केलेली नाही. मला ना बचावाची गरज आहे ना सहानुभूतीची. मी स्वतःवर समाधानी आहे. झीनत अमाान यांनी 1971 मध्ये ‘हलचल’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती, पण त्याच वर्षी ‘हरे रामा हरे कृष्णा’ मधून त्यांना खरी ओळख मिळाली.”

झीनत अमान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या अनेकदा त्यांच्या आयुष्याशी संबंधित रंजक माहिती इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. ज्येष्ठ अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री ‘शोस्टॉपर’ या वेब सिरीजद्वारे ओटीटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.( bollywood actress zeenat aman says people were more interested in her face and figure than her intellect)

अधिक वाचा-
नवाजुद्दीन अन् शहनाज गिलच्या नवीन गाण्याचे पोस्टर रिलीज, ‘या’ दिवशी येणार चाहत्यांच्या मनोरंजनासाठी

कॅटरिनाच्या ‘या’ चित्रपटासाठी विकीने दिले हाेते ऑडिशन, पण अभिनेत्याला करावा लागला नकाराचा सामना

हे देखील वाचा