‘किंग खान’चे इंडस्ट्रीतील ३० वर्षे पूर्ण; भावुक होत म्हणाला, ‘अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य तुमचे…’


बॉलिवूडमधील ‘बादशाह’ आणि ‘किंग खान’ या नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे शाहरुख खान. रोमान्स, ऍक्शन, इमोशनल, ड्रामा या सगळ्या गोष्टी चित्रपटात अत्यंत उत्तम रीतीने तो निभावत असतो. शाहरुख खानला चित्रपटसृष्टीत येऊन 30 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याने 1992 मध्ये दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर त्याने ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्याने प्रेक्षकांच्या मनात त्याची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने आतापर्यंत जवळपास 100 पेक्षाही अधिक चित्रपटात काम केले आहे. त्याने चित्रपटसृष्टीत 30 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. (Shahrukh Khan complete 30 years in film industry, share an emotional post on social media)

शाहरुख खानने ट्वीट करून त्याच्या या प्रवासाबद्दल चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्याने लिहिले की, “30 वर्षांपासून तुम्ही मला प्रेम देत आहात. मला या गोष्टीची जाणीव झाली आहे की, अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य मी तुमचे मनोरंजन करण्यात घालवले आहे. मी वैयक्तिक तुम्हाला भेटेल आणि प्रेम देईल. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.”

शाहरुख खानच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुकाचे पूल बांधण्यास सुरुवात केली आहे. त्याचे चाहते त्याचे जुने फोटो ट्वीट करून प्रेम व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “किंग, आम्ही नेहमीच तुझ्यासोबत आहोत.”

त्याच्या दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “तुमच्या या प्रवासाने अनेक मध्यम वर्गीय लोकांना प्रेरणा दिली आहे. काही बनण्यासाठी ताकद नाही, तर नशीबाची गरज असते.” एका चाहत्याने शाहरुख खानच्या घरासमोर लाखो लोक जमलेला फोटो शेअर करून लिहिले आहे की, “तुम्ही या प्रकारची गर्दी खरेदी नाही करू शकत. हे केवळ तुम्ही कठोर परिश्रम आणि समर्पणाने मिळवू शकता.”

त्याने दूरदर्शनवर असणाऱ्या ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ या मालिकांमधून टेलिव्हिजन दुनियेत प्रवेश केला होता. शाहरुख खानची तगडी फॅन फॉलोविंग आहे. शाहरुख खान हा त्याच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यात देखील यशस्वी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाची ऑनस्क्रीन सासूसोबत आहे खास मैत्री; भावना व्यक्त करत म्हणाली…

-आमिर खानच्या ‘या’ चित्रपटात झळकली होती कपिल शर्माची ‘ऑनस्क्रीन’ पत्नी सुमोना चक्रवर्ती; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार


Leave A Reply

Your email address will not be published.