Saturday, April 19, 2025
Home नक्की वाचा शाहरुख खानपासून ते कॅटरिना कैफपर्यंत, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे ‘या’ कलाकारांच्या नावाचा समावेश

शाहरुख खानपासून ते कॅटरिना कैफपर्यंत, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे ‘या’ कलाकारांच्या नावाचा समावेश

बॉलिवूड स्टार्सचे ग्लॅमरस लाइफ आणि स्टाईल सर्वांनाच आवडते. चाहते आपल्या आवडत्या स्टार्सची कॉपी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांची ग्लॅमरस लाईफस्टाईल चाहत्यांना आकर्षित करते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, असे काही स्टार्स इंडस्ट्रीत आहेत, ज्यांची नावं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली गेली आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की, त्यांनी असे काय केले आहे की, जो विश्वविक्रम बनला आहे. चला तर मग अशा कलाकारांबद्दल आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल जाणून घेऊया. ज्‍यामुळे त्‍यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आणि चित्रपट आहेत, ज्यांची नावे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहेत. या यादीतील पहिले नाव बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे (Shahrukh Khan) आहे. ज्याचे नाव २०१३ मध्ये सर्वाधिक कमाई करणार्‍या बॉलिवूड स्टार्सच्या यादीत शीर्षस्थानी होते. फोर्ब्सच्या यादीनुसार किंग खानने २०१३ मध्ये २२०.५ कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

कॅटरिना कैफ (Katrina Kaif)
यावर्षी अभिनेत्री कॅटरिना कैफच्या नावाचीही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंद झाली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, कॅटरिनाने २०१३ मध्ये बॉलिवूड अभिनेत्रींच्या श्रेणीत ६३.७५ कोटी रुपये कमावले होते.

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)
या यादीत पुढचा क्रमांक येतो अभिनेता अभिषेक बच्चन याचा. माध्यमांतील वृत्तानुसार, २००९ मध्ये आलेल्या ‘दिल्ली ६’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिषेक बच्चनने अवघ्या १२ तासांत अनेक शहरे कव्हर केली. त्यामुळे त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले.

आशा भोसले (Asha Bhosle)
या क्रमात पुढचा क्रमांक येतो गायिका आशा भोसले यांचा. आशा ताईंनी २० हून अधिक भाषांमध्ये ११ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. ज्यामुळे त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट झाले आहे.

त्याचवेळी, तुम्हाला माहित आहे का की, ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांच्या ‘कहो ना प्यार है’ (Kaho Naa… Pyaar Hai) चे नाव देखील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट आहे. होय, हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडला की, या चित्रपटाला एक-दोन नव्हे तर तब्बल १०२ पुरस्कार मिळाले. ज्यामुळे या चित्रपटाचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा