Monday, April 20, 2026
Home बॉलीवूड रूमचे लाईट बंद करत अमिषा पटेलने शेअर केला तिचा अंधारातला एक व्हिडिओ, पाहून तुम्ही देखील व्हाल दंग

रूमचे लाईट बंद करत अमिषा पटेलने शेअर केला तिचा अंधारातला एक व्हिडिओ, पाहून तुम्ही देखील व्हाल दंग

बॉलिवूडमध्ये अशा खूप कमी अभिनेत्री आहेत, ज्यांना त्यांच्या पहिल्याच सिनेमातून अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. याच यादीतील एक अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. अमिषा पटेलला तिच्या पहिल्याच ‘कहो ना प्यार हैं’ सिनेमाने एका रात्रीत सुपरस्टार केले. मात्र अमिषाला तिचे यश टिकवता आले नाही आणि काही हिट सिनेमे देऊनही अमिषा मागे पडली. जरी चित्रपटांमध्ये अमिषा अगदीच कमी दिसत असली तरी सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसते.

सोशल मीडियावर अमिषा तिचे बोल्ड फोटो आणि हॉट व्हिडिओ शेअर करत बऱ्याचदा लाईमलाइट मिळवत असते. नुकताच तिने तिचा एक अतिशय मादक आणि आकर्षक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती खूपच बोल्ड दिसत असून, हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे. तिने तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमिषा पटेल अंधारात बसलेली दिसत आहे. यावेळी तिने एक खूपच बोल्ड वन पीस ड्रेस घातला असून, ती तिचा फोन वापरतं दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “गुड नाईट.” सोशल मीडियावर तिच्या या व्हिडिओला फॅन्सकडून खूपच पसंत केले जात आहे. याशिवाय तिच्या लक्षवेधी अंदाजवर कमेंट्स करत तिचे कौतुक देखील होत आहे.

अमिषाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच ‘गदर’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये दिसणार असून, सध्या या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर २’ सिनेमा २००१ साली आलेय ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल असणार आहे. याशिवाय बिग बॉसच्या १३ व्या पर्वात अमिषा पटेलने घराच्या मालकीच्या रूपात एन्ट्री घेत घरातील सदस्यांकडून विविध टास्क करून घेतले होते. मात्र मधेच ती या शोमधून गायब झाली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा