अभिनेता शाहरुख खान सध्या त्याचा मोस्ट अवेटेड ‘पठाण’ चित्रपटामुळे खूपच चर्चेत आला आहे. त्यामधील ‘बेशरम रंग‘ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. त्यामुळे शाहरुख आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांना चांगलच ट्रोल केलं जातंय. त्याशिवाय अभिनेत्याचे पुतळे बवून जाळपोल देखिल केली जातीय मात्र, या सगळ्या गोष्टी घडत असूनही थाटात उभे राहून आपली बाजू मांडणे हे फक्त किंग खान म्हणजेच शाहरुख खानच करु शकतो.
नुकतंच पार पडलेल्या ‘कोलकत्ता फिल्म फेस्टिवल’मध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan), शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) सारख्या अनेक दिग्गज कलारांनी हजेरी लावली होती. त्यासोबतच अभिनेता शाहरुख खान (Shaharukh Khan) याने देखिल या फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. त्याचा आगामी येणारा चित्रपट ‘पठाण’ (Pathan) सध्या बॉयकॉट केलं जातंय. त्याशिवय ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यावरुन वादही पेटला आहे.
अभिनेत्री दीपिका पादूकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे हिंदु धर्माचा अपमान झाला आहे अशा वादामुळे ‘पठाण’ चित्रपटावर बॉयकॉट ट्रेंड सरु झाला आहे. मात्र, .या वादावर अभिनेत्याने आपले मौन तोडले आहे. त्याने नुकत्याच पार पडलेल्या ‘कोलकत्ता फिल्म फेस्टिवल’मध्ये थाटात उभं राहून प्रेक्षकांना त्याच्या डायलॉगद्वारे पटवून दिले आहे की, त्याला बॉयकॉटचा काहिच फरक पडत नाही. त्याच्यासोबत त्याला पाठिंबा देणारे लोक त्याच्या सोबत उभे आहेत त्यामुळे अभिनेता खंबीरपणे उभा आहे. त्याने भाषण केलेली एक शॉर्ट व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लीपमध्ये शाहरुखने सांगितले की, “अपणी खुडसी की पेटी बांध लिजिये. मोसम बिघडनेवाला है, आणि खूप दिवसांपासून आपण सगळे भेटलो नाहीत. आता सगळं वातावरण शांत झालं आहे. आपण सगळे खुश आहोत, मी सगळ्यात जास्त खुश आहे आणि ही गोष्ट सागण्यासाठी मला काहीच आपत्ती नाही वाटत. कारण तुम्ही काहीही करा मी आणि तुम्ही आणि सगळे आणि सकारात्मक विचार असाणारे लोकं अजून जिवंत आहेत.”
Yes .. “No matter what ,people like us will stay positive” #Pathan #ShahRukhKhan #justasking https://t.co/tIKcSts7X2
— Prakash Raj (@prakashraaj) December 15, 2022
शाहरुखच्या अशा डायलॉगबाजीनंतर चात्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. शाहरुखच्या भाषणानंतर त्याचे अनेक कालाकारांनी कौतुक केले त्याशिवय चाहत्यांमध्ये तो पूर्वीच किंग होता आणि आता त्याने सिद्ध केल्यासारखे दिसून येत आहे. त्याच्या अशा वक्तव्यानंतर साउथ सुपरस्टारर प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ट्वीट शेअर करत शाहरुखला पाठिंबा देत लिहिले की, “होय.. काहीही असो, आमच्यासारखे सकारात्मक लोक राहतील” त्याशिवया चाहत्यांमध्ये देखिल शाहरुखविषयी अजूनच अभिमान वाढला आहे. त्याच्या वक्तव्याने सगळ्यांमध्ये चित्रपटाविषयी उत्साह निर्माण केला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘पठाण’ चित्रपटाचा पेटलाय वाद! इंदौरमध्ये जाळपोळ, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
‘महाभारत’ या सुरेल उपक्रमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, युट्यूबवर हाेतंय प्रचंड व्हायरल