Sunday, June 4, 2023

‘खाटाखाली चप्पल शोधत आहेस का..?’ ‘बेशरम रंग’ गाण्यावर चोरीचा आरोप तर ट्रोलर्सने दीपिकाची घेतली शाळा

अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारा चित्रपट ‘पठान‘ यामधील नुकतंच नवीन गाणं ‘बेशरम रंग‘ प्रदर्शित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या डान्स स्टेपने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र, या गाण्याला ट्रोलर्सने धरेवर धरले आहे. त्याशिवाय गाण्यावर चोरीचा आरोपही लावला आहे.

बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान (Shaharukh Khan) याचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पठान’ (Pathan) सध्य खूपच चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच (दि, 09 डिसेंबर) रोजी चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं. मात्र, या गाण्यावर बॉयकॉट टोळीच्या निशाण्यावर आलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याला नेटिजन्स जोरदार ट्रोल करत आहेत.

‘पठान’ तचित्रपटामधील दीपीका पोदिकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख यांचं बेशरम रंग गाणं बोल्ड आणि इरोटिक गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मात्र, गाण्यावर ट्रोलर्सने निशाना साधला आहे. ‘बेशरम रंग’ गाणयावर जैनमधील मरीबा गाण्याचे संगित चोरल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय गाण्यामधील काही हुक स्टेप चाहत्यांना फार काही आवडल्याचे दिसत नाही. त्यामुळे गाण्यावर धमाकेदार मीम्स बनवून दीपाकाची शाळा घेतली जात आहे.

बेशरम गाण्यामध्ये दीपिका खूपच बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळाली, काही चाहत्यांना तिचा लूक आवडला तर काहींनी तिच्या डान्स स्टेपचा मजाक बनवला आहे. गाण्यामधील दीपिका एक ट्वर्क स्टेप करताना दिसून येत असून त्या स्टेपवरुन अभिनेत्रीला जोरदार ट्रोल करत आहेत. एका युजरने ट्वीट करत लिहिले की, ‘पान,पराग, लक्स, मुंग्या, चिप्स, अवॉर्ड गॅरंटी या बेस्ट कोरियोग्राफरसाठी.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “काय खाटाकाली चप्पल शोधत आहेस का?”, एका अन्य युजरने दीपिका, कोरिओग्राफर आणि निर्माता या तिघांनाही निशाण्यावर धरत लिहिले की, “कोरिओग्राफर आणि माझी फेवरेट दीपिका काय विचार करत आहेत? बॅकग्राउंड डान्सर असा डान्स करत आहेत जसं की, यांच्या अंगात देवीच आली आहे.” काही लोकांनी तर दीपिकाच्या डान्स स्टेप आणि बेशरम रंग गाणं पुर्णपणे कॉपी केले आहे, त्याशिवय गाण्याचे संगितही चोरलं आहे, अशाप्रकारचे आरोप केले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘गोपी बहू’अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावर हळदी समारंभाच्या फोटोचा कहर…

नकारात्मक भूमिका साकारून सुपरस्टार झालेले ‘हे’ आहेत टॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार, जाणून घ्या

हे देखील वाचा