Saturday, November 9, 2024
Home मराठी ‘महाभारत’ या सुरेल उपक्रमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, युट्यूबवर हाेतंय प्रचंड व्हायरल

‘महाभारत’ या सुरेल उपक्रमातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, युट्यूबवर हाेतंय प्रचंड व्हायरल

गीत रामायण प्रमाणे महाभारतावर आधारित गीत ‘महाभारत’ हा सुरेल उपक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. या उपक्रमाचे पहिले गाणे ‘ज्ञान हे असते द्वार मनाचे’ प्रदर्शित झाले आहे. हे गाणे पंडित रघुनंदन पणशीकरांनी गायलेले असून युट्यूबवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

या गाण्याचे गीतकार शशिकांत पानट आहेत, तर गाण्याला संगीत गाैरीश तळवलकर यांनी दिले आहे. प्रसिद्ध पराम माटेगांवकर या गाण्याचे कार्यकारी निर्माते आहेत. यासाेबतच गाण्याचे व्हिडिओ दिग्दर्शन पी ओर साेहम कुरुलकर ह्याने केलेले आहे.

 

‘ज्ञान हे असते द्वार मनाचे’ या गाण्यामध्ये तेजश्री प्रधान सांगते की, शंभर कौरव आणि पाच पांडव महर्षी कृपाचार्यांच्या आश्रमात शिकत होते. प्रत्येक शिष्य आपापल्या परीने ज्ञान ग्रहण करीत होते आणि गुरूची सेवा करीत होते! आश्रमीय शिक्षण आता संपत आले होते. घरी परत जाण्यापूर्वी गुरूंनी सर्व शिष्यांची परीक्षा घेतली. उत्तम ज्ञान मिळउनच शिष्य परत जात आहेत याची महर्षींनी खात्री करून घेतली. दुसरऱ्या दिवशी सारे शिष्यगण राजवाड्यात परत जातील आणि हा आश्रम चैतन्यहीन होईल अशा विचाराने गुरू महर्षि अगदी खिन्न झाले. सर्व शिष्यांना एका भल्या मोठ्या वृक्षछायेत बसवून ते त्यांना अखेरचा उपदेश करू लागले: ज्ञान हे असते द्वार मनाचे! मार्ग आक्रमा आयुष्याचा, जोडित सेतु मनांचे!

हा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केल्यानंतर प्रचंड व्हायरल हाेत असून चाहते या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “अप्रतिम रचना आणि सुमधुर कर्णप्रिय प्रस्तुती”, तर दुसऱ्या चाहत्याने कमेंट करत  लिहिले की, “अप्रतिम बोल, स्वर आणि संगीत.. एकनाथ वाघ” अशाप्रकरे चाहते गाण्यावर लाईक आणि कमेंट्सचा भरभरुन वर्षाव करत आहेत. (The first song of ‘Mahabharata’ or Surel’s venture was hit by the audience, huge viral on YouTube)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
वेस्टर्न ड्रेसमध्ये खुललं साराचं रूप; फोटो पाहून म्हणाल, ‘झकास’

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम सुमित पुसावळे अडकला विवाह बंधनात; पाहा नव्या जाेडीचे फाेटाे

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा