Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड शाहरुख खानने ऐकला मुलगी सुहानाचा सल्ला, ‘अशा’पद्धतीने लाइफ एन्जॉय करताना दिसला ‘बादशाह’

शाहरुख खानने ऐकला मुलगी सुहानाचा सल्ला, ‘अशा’पद्धतीने लाइफ एन्जॉय करताना दिसला ‘बादशाह’

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या चाहत्यांना खूप सरप्राईज देत आहे. एकापाठोपाठ एक धमाकेबाजी करून चाहत्यांवर भुरळ पाडत आहेत. प्रथम बेवरेज जाहिरात, नंतर ‘पठाण’ चित्रपटाची घोषणा आणि आता व्हिजिट दुबई व्हिडिओ. व्हिडिओच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना सांगितले आहे की, ते देखील शाहरुखसोबत दुबईला जाऊ शकतात. खरं तर, ही सशुल्क भागीदारी जाहिरात आहे. यामध्ये शाहरुख त्या सर्व गोष्टी करताना दिसत आहे, ज्याचा सल्ला सुहाना खान त्याला फोनवर देते.

शाहरुखच्या जाहिरातीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल
व्हिडिओची सुरुवात शाहरुखने सिग्नेचर स्टेप करताना केली होती, जिथे शूटिंग संपते. यानंतर शाहरुखला सुहानाचा फोन आला. ज्यामध्ये ती तिच्या वडिलांना दुबईमध्ये एन्जॉय करण्याचा सल्ला देते. याच संधीचा फायदा घेत शाहरुख देखील आधी कोरिओग्राफरसोबत स्ट्रीट डान्स करतो. मुलांसोबत सेल्फी घेतो. दुबईच्या रस्त्यांची झलक ते समुद्रकिनारी मुलांसोबत फुटबॉल खेळतात आणि शेवटी नाईट लाइफ पार्टीचा आनंद लुटताना दिसतो.

शाहरुखचा हा व्हिडिओ पाहून चाहते खूश झाले आहेत. या व्हिडिओमध्ये अभिनेत्याचा दमदार लूक दिसत आहे. शाहरुखचे लांब केस, डेपर लूक आणि मनमोहक हास्याने चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे. बऱ्याच कालावधीनंतर शाहरुख रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे, ज्याबद्दल तो खूप उत्सुक आहे. त्याच्यापेक्षा त्याचे चाहते जास्त उत्सुक आहेत.

शाहरुख खान गेल्या काही महिन्यांपासून वादात होता. सर्वप्रथम शाहरुखचे नाव मुलगा आर्यन खानच्या अटकेमुळे चर्चेत आले होते. यानंतर लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी नमाज पठण करताना तो भारावून गेला. त्याच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर ‘पठाण’ चित्रपटातील जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणचा लूक समोर आला असला तरी शाहरुखच्या चाहत्यांना चित्रपटाच्या टीझरमध्ये फक्त त्याचाच आवाज ऐकायला मिळाला आहे. त्याचा लूक अजून समोर आलेला नाही.

शाहरुख २०१८ साली ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्माही दिसल्या होत्या. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर शाहरुख खान कोणत्याही चित्रपटात दिसला नाही आणि आता तो थेट ‘पठाण’मध्ये दिसणार आहे. ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख खान साऊथ डायरेक्टर एटली आणि राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटातही दिसणार आहे. मात्र, या चित्रपटांची अधिकृत घोषणा झालेली नाही.

हेही वाचा –

हे देखील वाचा