Friday, March 29, 2024

Womens Day Special : ‘या’ महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाने उंचावले संपूर्ण जगात भारताचे नाव

‘स्त्री’ निसर्गाने तयार केलेली अशी एक शक्ती आहे, ज्यामध्ये आनंदाचे अंतिम सत्य दडलेले आहे. एक आई, बहीण, मुलगी,मैत्रीण, प्रियसी, बायको अश्या अनेक भूमिकेतून ती प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद पसरवत असते.कोणत्याही भूमिकेत असली तरी तिच्यात जन्मजात असलेल मातृत्व नेहमीच दिसून येते. आपल्या कर्तुत्वाने ती सगळीकडेच आपले अढळ स्थान निर्माण करत असते. अगदी जागतिक स्तरावर देखील तिने आपली छाप पाडली आहे. आज स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. अगदी चित्रपटसृष्टीपासून ते अंतराळात जायला देखील ती कमी पडली नाही. बारीक विचार केला तर, आजही समाजातील पुरुष प्रधान संस्कृती , स्त्रियांना त्यांचे हक्क देण्यास मान्यता देत नाही. केवळ स्त्रीवाद हा शिकून आणि वाचून जमणार नाही. तर त्या गोष्टी अंमलात आणण्याचाही प्रयत्न केलाच पाहिजे.

8 मार्च हा दिवस सर्वत्र आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा एकच उद्देश आहे की, महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीने सगळे हक्क मिळायला पाहिजे. आजही अनेक ठिकाणी महिलांना चूल आणि मूल एवढीच जबाबदारी दिली जाते. एकीकडे आपला भारत महासत्तेकडे वाटचाल करत स्त्रियांना उच्च दर्जा देत आहे, तर दुसरीकडे काही महिलांना त्यांचे मूलभूत हक्क देखील मिळत नाहीयेत. स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्याच्या हा एक छोटासा प्रयत्न म्हणून हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आजच्या दिनी महिलांच्याबद्दल असलेला आदर ,प्रेम भावना व्यक्त केल्या जातात. महिलांचे आर्थिक, राजकीय, सामजिक क्षेत्रात योगदान समाजापुढे दाखवले जाते. त्यामुळे इतर महिला त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया अश्याच काही कर्तृत्ववान महिलांबाबत

कल्पना चावला
नासा वैज्ञानिक आणि अंतराळात प्रवास करणारी महिला म्हणजे कल्पना चावला. तिचा जन्म हरियानामध्ये झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने 1982 मध्ये पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. पदवीनंतर ती अमेरिकेल गेली आणि आपले पुढचे शिक्षण पूर्ण केले. 1995 मध्ये ती नासाच्या अंतराळातील प्रवासासाठी सज्ज झाली. 1 फेब्रुवारी 2003 मध्ये अंतराळातून परत येताना अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सगळा भारत तिच्या परत येण्याच्या आनंदाने खूपच भारावून गेला होता. परंतु क्षणातच त्यांचा आनंद मावळला. संकटाना घाबरणे कल्पनाला कधी जमलेच नाही. ती नेहमी धैर्याने कोणत्याही प्रसंगाला सामोरे जात असे. तिने जे ठरवले ते ती पूर्ण करूनच दाखवत असे. भलेही आज ती आपल्यामध्ये नाहीये.पण आजही तीच नाव कर्तुत्ववान महिलांमध्ये घेतलं जातं.

सुनिता विल्यम्स 
सुनिताचा जन्म 19 सप्टेंबर 1965 साली झाला. तीचे नाव केवळ अंतराळातचं नव्हे तर इतर अनेक क्षेत्रात देखील घेतले जाते. अंतराळात जाणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली होती. 1987 मध्ये सुनिता अमेरिकेतील नैसेना येथे दाखल झाली. तिथून 1998 मध्ये तिची नासामध्ये निवड झाली. सुनिता संपूर्ण भारतासाठी आणि जगासाठी चमकता सितारा आहे, जीने 195 दिवस अंतराळात राहून रेकॉर्ड बनवले होते. सुनिता त्या सगळ्या महिलांसाठी एक प्रेरणा आहे, ज्या आपल्या आयुष्यात काहीतरी करु इच्छितात.

कमला हॅरीस 
20 ऑक्टोंबर 1965 मध्ये ऑकलंडमध्ये जन्म झालेल्या कमला आज अमेरिकेची उप्राष्ट्रध्यक्ष आहे. कमलाची आई भारतीय आणि वडील जमैकन आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवल्यानंतर कमलाने सेन फ्रान्सिस्को डिस्ट्रिक्ट येथून आपल्या करीअरला सुरूवात केली. 2010 मध्ये ती कलिफॉर्नियाची ऑटोनी बनलेली पहिली महिला आणि पहिली कृष्णवर्णीय व्यक्ती होती. कमला हैरिची प्रतिमा एका आफ्रिकी आणि अमेरिका राजकारणातील नेता म्हणून खूप भक्कम आहे. अश्या स्त्रीबद्दल का बरं कोणाला अभिमान नाही वाटणार? तिचा हा संघर्ष दाखवत आहे की, येणाऱ्या काळात स्त्रिया देखील मोठ्या संख्येने राजकारणात प्रवेश करणार आहेत.

प्रियांका चोप्रा 
18 जुलै 1982 मध्ये जन्मलेली प्रियांकाने बॉलिवूड ते हॉलिवुडपर्यंत संपूर्ण‌ जगभरात नावं कमवले आहे. 2002 मध्ये मिस वर्ल्डचा पुरस्कार जिंकून तिने तिची छाप पडली. यानंतरच संपूर्ण जगभरात तिची ओळख निर्माण झाली.
प्रियंका ही बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. ती म्हणते की ,तिला तिच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कोणत्याही पुरुषाच्या सहार्याची गरज नाहीये. पूर्ण जगात आज तिचे चाहते आहेत. चित्रपटसृष्टीत ती कोणत्याही वशिल्यानी आली नाही. आज तिने जे काही कमवले आहे ते स्वतःच्या मेहनतीच्या आणि हुशारीच्या जोरावर कमवले आहे. प्रियांका भारतातली पहिली महिला आहे हिने आंतरराष्ट्रीय टीव्ही सीरिजमध्ये मुख्य भूमिका निभावली आहे.
प्रियंका असे म्हणते की,” माझ्या यशाचं श्रेय मी नेहमीच स्वतःला देईल. कारण मी आज जे काही कमवले आहे ती स्वत:च्या हिमतीवर कमवले आहे. आयुष्यात सगळी संकटे पेलण्याची आणि खंबीर होण्याची क्षमता मी तयार केली आहे.”

Priyanka-Chopra
Photo Courtesy: Instagram/priyankachopra

लाला युसुफजाई
मलालाचा जन्म पाकिस्तानमधील स्वात या जिल्ह्यात झाला. तिच्या वडिलांचे नाव जियाउद्दिन युसुफजाशई हे आहे. 2009 मध्ये वयाच्या अवघ्या 10 वर्षात तीने ‘गुल मकाई’ या नावाची डायरी लिहिली आणि इथूनच ती नावारूपाला आली. डायरीमध्ये तिने तालीबानच्या अधिपत्याखालील खोर्यातील अनेक भयानक प्रसंग सर्वांसमोर मांडले.
मलालावर नाराज असणाऱ्या चारमपंथियांनी तिच्या शाळेची बस थांबवून 2012 मध्ये तिला गोळी झाडली. गंभीररित्या घायाळ झालेल्या मलालाला उपचारांसाठी ब्रिटनला घेऊन जावे लागले. खूप दिवसांच्या उपचारांनंतर ती व्यवस्थित झाली. मलालाला आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार, पाकिस्तानचा राष्ट्रीय शांती पुरस्कार यांच्या सोबतच अनेक मोठमोठ्या सन्मानानं सन्मानित करण्यात आलं आहे. तिच्या या बहादुरीला सलाम करताना संयुक्त राष्ट्राने 22 जुलैला तिच्या वाढदिवसानिमित्त मलाला दिवस घोषित केला गेला आहे. एक मानवी अधिकार कार्यकर्ती म्हणून तिचे समाजामधे एक अढळ स्थान निर्माण झाले आहे. मलाला एका खूप कठीण पुरुषवादी विचारसरणी विरूद्ध लढत आहे आणि त्यातून तिला यश देखील प्राप्त झाले आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा