गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी! कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील शाहरुख खानचा फोटो व्हायरल


बॉलिवूडचा सुपरस्टार आणि रोमँटिक हिरो म्हणून ज्याची ख्याती आहे, तो अभिनेता म्हणजेच सर्वांचा लाडका शाहरुख खान होय. कोणत्याही गॉडफादरचा पाठीवर हात नसताना स्वत: च्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये आपले भक्कम असे स्थान कमावणारा अभिनेता म्हणूनही शाहरुखला ओळखले जाते. शाहरुखने आतापर्यंत साकारलेल्या आपल्या भूमिकांनी स्वत: ला बॉलिवूडचा ‘बादशाह’ सिद्ध केले आहे. अशातच त्याचा कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा अप्रतिम फोटो तेव्हाचा आहे, जेव्हा शाहरुखला थिएटरची आवड होती. या फोटोत त्याला ओळखणेही कठीण झाले आहे.

शनिवारी (१२ जून) एका ट्विटर युजरने शाहरुख खानचा कधीही न पाहिलेला फोटो शेअर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शाहरुखचा फोटो अन् तोही सुरुवातीच्या काळातील म्हणल्यावर, चाहत्यांनाही हा फोटो पाहण्याचा मोह आवरला नसेल, हे मात्र नक्की. या ब्लॅक एँड व्हाईट फोटोत एकदम साधारण आणि हाडकुळा शाहरुख आणि संजय रॉय कोणत्यातरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सहकाऱ्यांसोबत दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत ‘अप्रतिम फोटो’, ‘मस्तच’ यांसारख्या कमेंट्स केल्या आहेत.

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच संजय रॉय यांनी या फोटोशी संबंधित जुन्या आठवणींना पुन्हा एकदा ताज्या केल्या. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो रिट्विट केला आहे. संजय रॉय हे आता एक इव्हेंट्स मॅनेजमेंट कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

संजय रॉय यांनी हा फोटो रिट्विट करत यामागील कहाणी सांगितली. त्यांनी लिहिले की, “हा फोटो तेव्हाचा आहे, जेव्हा ते दिग्दर्शक बॅरी जॉन यांच्या प्ले रफ क्रॉसिंगसाठी कोलकाताला रवाना होणार होते.” अनेक वर्षांपूर्वींचा शाहरुख खानचा हा फोटो पाहून चाहत्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा आनंद एल राय यांच्या ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफही मुख्य भूमिकेत होत्या. आता शाहरुख यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या ऍक्शन थ्रिलर ‘पठाण’ या चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटात सलमान खानदेखील विशेष भूमिकेत दिसणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सलमान खानची ग्रँड एन्ट्री ही चक्क हेलिकॉप्टरमधून होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.