Tuesday, July 9, 2024

सगळ्यात जवळचा असूनही फरहान अन् शिबानीच्या लग्नाला अनुपस्थित होता शाहरुख, काय होते कारण?

फरहान अख्तर (Farhan Akhtar)आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांनी अलिकडेच लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाला बॉलिवूडचे सर्व सेलेब्स आणि स्टार्स उपस्थित होते. फरहान आणि शिबानीचे लग्न जावेद अख्तर यांच्या खंडाळा फार्महाऊस ‘सुकून’ येथे मोठ्या थाटामाटात पार पडले. अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor), अमृता अरोरा (Amrita Arora), करिश्मा कपूर (Karisma Kapoor), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), सुहाना खान (Suhana Khan), आर्यन खान (Aryan Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) या लग्नात खास पाहुणे म्हणून हजेरी लावताना दिसले. तर तिथे निर्माता रितेश सिधवानी देखील फरहानसोबत त्याचे खास बॉन्ड शेअर करताना दिसला. मात्र यादरम्यान अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) या लग्नात कुठेही दिसला नाही.

जावेद अख्तर यांच्या फार्महाऊसवर पोहोचला नाही शाहरुख, काय कारण होतं?
माध्यमांतील वृत्तानुसार, शाहरुख खानला अजून प्रकाशझोतात यायचे नव्हते. माध्यमांतील वृत्तानुसार, सूत्राने सांगितले की, शाहरुख खानला लो प्रोफाइल राहायचे होते, त्याला सध्या कोणाच्याही नजरेत यायचे नव्हते. सध्या शाहरुख कोणत्याही खास प्रोजेक्टसाठी दिसला नाही, त्यामुळे तो कुठेही बाहेर जाण्याचे टाळत आहे.

शाहरुख खान सार्वजनिक ठिकाणी कोणत्या वेळी दिसला?
त्याचवेळी मुलगा आर्यनच्या अटकेनंतरही शाहरुखने सार्वजनिकपणे दिसणे कमी केले होते आणि त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये मुलगा अं’मली पदार्थ प्रकरणात अडकला होता. माध्यमांतील वृत्तानुसार, शाहरुख तेव्हापासून त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. फक्त एकदाच दिसला होता. त्यानंतर शाहरुखचा लूकही चांगलाच व्हायरल झाला. यानंतर तो पुन्हा लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारात दिसला.

शाहरुख खानने फरहान-शिबानीला केला होता फोन
माध्यमांतील वृत्तानुसार, फरहान-शिबानीच्या लग्नात शाहरुख खान पोहोचला नसला, तरी शाहरुख खानने या जोडप्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठवले आहेत. सूत्राच्या म्हणण्यानुसार, शाहरुख खानने फरहान आणि शिबानीला फोन करून अभिनंदन केले होते आणि खूप प्रेम आणि आशीर्वादही दिले होते. शाहरुख सोडून त्याचे संपूर्ण कुटुंब लग्नाला गेले होते.

शाहरुख खानने १९९२ साली आलेल्या ‘दिवाना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शाहरुखची जी भूमिका होती ती आधी अरमान कोहलीला ऑफर करण्यात आली होती. अरमानने या सिनेमासाठी होकार देखील दिला होता. इतकंच नाही, तर त्याचा फोटो असणारं सिनेमाचं पोस्टर देखील छापण्यात आलं होतं. मात्र काही कारणामुळे त्याने नंतर चित्रपट करण्यास नकार दिला आणि या चित्रपटाची शाहरुखला ऑफर मिळाली. या चित्रपटाने बॉलिवूडला एक मोठा सुपरस्टार दिला.

हेही वाचा –

हे देखील वाचा