Monday, July 8, 2024

श्रेयस तळपदेला लागली लॉटरी! कंगनाच्या ‘इमर्जन्सी’मध्ये बनला माजी पंतप्रधान, फर्स्ट लूक वेधतोय लक्ष

‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत होय. कंगना नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. आता ती नवीन सिनेमा घेऊन येत आहे. तिच्या सिनेमाचे नाव ‘इमर्जन्सी’ असे आहे. या सिनेमाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. त्याच्या या सिनेमात मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याची एन्ट्री झाली आहे. मराठी आणि हिंदी सिनेमात अभिनयाचा जलवा दाखवणारा श्रेयस या सिनेमात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अशात त्याचे सिनेमातील पहिले पोस्टर जाहीर करण्यात आले आहे. हे पोस्टर खुद्द अभिनेत्री कंगना रणौतने शेअर केले आहे.

यापूर्वी जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत असणारे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणाऱ्या कंगना रणौत (Kangana Ranaut) हिचाही फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याचा लूक शेअर केले आहे. यासोबत तिने लिहिले आहे की, “भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘इमर्जन्सी’मधील श्रेयस तळपदेचा लूक सादर करत आहे. एक सच्चा राष्ट्रवादी, ज्यांचे राष्ट्राप्रती प्रेम आणि अभिमान अतुलनीय होता आणि आणीबाणीच्या काळात जे उदयोन्मुख युवा नेते होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

श्रेयसचा लूक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया
कंगनाच्या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “श्रेयस या लूकसाठी सर्वोत्तम निवड आहे.” तसेच, काही चाहत्यांना हा लूक आवडला नाही. एका युजरने लिहिले की, “सध्या तरी हा कोणत्याही प्रकारे अटलजींसारखा दिसत नाही. बाकीचं सिनेमा पाहिल्यानंतरच समजेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

‘इमर्जन्सी’ सिनेमा केव्हा होणार प्रदर्शित
कंगना रणौत आणि अनुपम खेर यांच्या भूमिका असलेल्या ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २५ जून, २०२३ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. या सिनेमाची तयारी अद्याप सुरू आहे. या सिनेमाची निर्मिती कंगना रणौत तिच्या ‘मणिकर्णिका’ प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली करत आहे. विशेष म्हणजे, स्वत: कंगनाच या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याचं मोडलं हाड, हॉस्पिटलमधून शेअर केला वाईट अवस्थेतील फोटो
तब्बल आठ वर्षांनी ‘चला हवा येऊ द्या’ टीमसाठी मिळाली आनंदाची बातमी, श्रेया बुगडेने केला खुलासा
रणवीर सिंगचा पाय आणखी खोलात! मनसेकडून गुन्हा दाखल, फोटो तात्काळ हटवण्याचा दिला इशारा

हे देखील वाचा