Thursday, July 18, 2024

‘दो हंसो का जोड़ा बिछड़ गयो रे…’ सिडनाजचा शेवटचा डान्स व्हिडिओ वायरल

‘बालिका वधू’ या मालिकेतून सिद्धार्थ शुक्ला (siddharth shukla) याने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केले. अन् ‘बिग बॉस’ जिकंल्यानंतर सिद्धार्थने चाहत्याचे लक्ष वेधले. ‘बिग बॉस’ सीजन 13’या शाे दरम्याण त्याची मैत्री शहनाज गिलसाेबत झाली. दाेघांची जाेडी चाहत्यांना इतकी पसंत पडली की, चाहते त्यांना फैंस सिडनाजने ओळखायला लागले.

या जाेडीने प्रेक्षकांचे भरपुर मनाेरंजन केले. पण अशातच शहनाज गिलवर (Shehnaaz Gill ) दुखाचा डाेंगर काेसळला. तर झाले असे की, मागच्या वर्षी म्हणजेच 2 सप्टेंबर 2021 राेजी सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) हार्ट अटॅकने निधन झाले. ज्यानंतर या दाेघांची जाेडी कायमची तुटली. तरीदेखील प्रेक्षक या जाेडप्याचे फाेटाे आणि व्हिडिओ बघुन सिद्धार्थची आठवन काढतात.

अशातच सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल चा एक डांस व्हिडिओ वायरल हाेत आहे. ज्यात ते दाेघे साेबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बघुन चाहते दिवंगत अभिनेत्याची आठवन काढत आहे. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाचा हा डांस व्हिडिओ ‘डांस दीवाने सीजन 3’ मधला आहे ज्यात माधुरी दीक्षित जज हाेती. या शाे मध्ये सिडनाज ‘हम्मा’ या गाण्यावर डांस करताना दिसत आहे.ज्यावेळी या रिएलिटी शोमध्ये ही जाेडी आली हाेती त्यावेळी देखील ह्या व्हिडिओने चाहतवर्गात धुमाकूळ घातली हाेती. आता पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघुन ‘सिडनाज’ वर चाहत्याचा वर्षाव हाेत आहे.

सिद्धार्थ शेवटीचे वेब सीरीज ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ मध्ये दिसले हाेते. आणि या सीरीजच्या प्रमोशनसाठी ते शहनाज गिलसाेबत ‘डांस दीवाने सीजन 3’ मध्ये आले हाेते. त्यादरम्यान शहनाज आणि सिद्धार्थने खूब मस्ती केली हाेती. या व्हिडिओला शहनाज ने 18 ऑगस्ट 2021  राेजी शेअर करुन कॅप्शन मध्ये लिहिले हाेते, ‘क्यों न सब दीवानों के साथ थोड़ी मैं भी दीवानी हो जाऊं.’

‘बिग बॉस’ सीजन 13′ च्या विजेत्यानंतर सिद्धार्थनं शहनाज साेबत अनेक म्यूजिक व्हिडिओ मध्ये काम केले. सिद्धार्थच्या निधनाचा जितका शहनाजला धक्का बसला तितकाचा चाहत्यांना देखील. म्हणूनच आज देखील सिडनाजचे फोटो-व्हीडीओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालताना दिसतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
रितेश जेनेलियाच्या घरी आला नवीन मेंबर, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
भोजपुरी अभिनेत्रीचे हॉटेमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनाही बसला धक्का
चारू असोपा-राजीव सेन मुलीसाठी पुन्हा एकत्र, घटस्फोट न घेण्याच्या निर्णयावर मेहुणी सुष्मिता सेन खूश

हे देखील वाचा