Thursday, July 18, 2024

रितेश जेनेलियाच्या घरी आला नवीन मेंबर, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोश पाहायला मिळत आहे. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी गणपती उत्सव साजरा होत असल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. सामान्यांसह गणेशोत्सवाचा जल्लोश सिनेसृष्टीतही पाहायला मिळत आहे. अनेक मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गणेशोत्सवाच्या धामधुमीतच अभिनेता रितेश देशमुखने आलिशान कार खरेदी केली आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून रितेश देशमुखचे नाव घेतले जाते. रितेश देशमुख बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि अनेक जबरदस्त भूमिका साकारुन रितेश देशमुखने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रितेश देशमुख आपल्या अभिनयाइतकाच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. रितेश देशमुखने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली आहे ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रितेश जेनेलियाने त्यांची एक बीएमडब्लू कार खरेदी केली आहे. त्यांची ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. या आलिशान कारची किंमत सुमारे 1. 16 कोटी रुपये इतकी आहे. रितेश देशमुखला आलिशान गाड्यांची आवड आहे. याआधीही त्याने बीएलडब्लू कार खरेदी केली होती. ही कार जेनेलियाने रितेशला वाढदिवसानिमित्त गिफ्ट केली होती. त्यानंतर आता रितेश देशमुखने आणखी एक कार खरेदी केली आहे.  रितेश देशमुखच्या ताफ्यात रेंज रोव्हर, बीएमडब्लू, अशा आलिशान गाड्यांचा समावेश आहे.

हेही वाचा – भोजपुरी अभिनेत्रीचे हॉटेमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनाही बसला धक्का
‘द काश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकाने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच साधला निशाणा; म्हणाले…
आजोबांच्या मांडीवर बसलेला हा मुलगा आहे असंख्य मुलींचा क्रश, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

हे देखील वाचा