उर्वशीच्या पोटात एका व्यक्तीने दणादण मारल्या बुक्क्या; त्रास होत असूनही अभिनेत्रीने गपगुमान केले सहन


चित्रपट यशस्वी होण्यासाठी उत्तम कथा, उत्तम कलाकार, अभिनय हे सर्व महत्त्वाचे असतेच. मात्र, यासोबतच चित्रपटातील अभिनय हा खरा असावा. आपला अभिनय खरा वाटण्यासाठी कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. पूर्वी एखाद्या विशिष्ट सीनसाठी कलाकार खोटा खोटा अभिनय करायचे. पण काळ बदलला तसे सिनेमाच्या व्याख्या देखील बदलल्या. आता आपला अभिनय अगदी खरा वाटावा यासाठी कलाकार आवश्यक गोष्ट शिकतात. ज्यामुळे त्यांचा अभिनय प्रेक्षकांना खोटा वाटू नये. यामध्ये कलाकार अगदी छोट्या गोष्टीपासून मोठमोठ्या गोष्टींचे प्रशिक्षण घेतात. कलाकारांची ही मेहनत तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा रसिकांकडून त्यांना पसंतीची पोचपावती मिळते.

अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील अपवाद नाही. आपल्या अभिनयाने, नृत्याने आणि सौंदर्याने प्रेक्षकांवर मोहिनी घालणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खूप कमी काळात यश मिळवले आहे. उर्वशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नेहमी ती तिचे व्हिडिओ, फोटो फॅन्ससोबत शेअर करताना दिसत असते. उर्वशीने नुकताच तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना अनेक प्रश्न देखील पडत आहेत.

उर्वशीचा हा व्हिडिओ बॉक्सिंग रिंगमधला असून यात तिला एक व्यक्ती पोटात लगातार बुक्क्या मारताना दिसत आहे. उर्वशी हात वर करून शांत उभी आहे. कदाचित तो तिचा ट्रेनर असावा. हा व्हिडिओ पाहून सर्वानाच प्रश्न पडतोय की नक्की काय चालू? उर्वशी शांत का उभी आहे? कोणत्या चित्रपटाचा सीन आहे का? असे अनेक प्रश्न फॅन्स विचारत आहे. मात्र, या सर्व प्रश्नांची उत्तरे उर्वशीच्या कॅप्शनवरून आपल्याला समजतील.

उर्वशीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. तो थेट माझ्या आतड्यांवर मला मारत आहे. हे अवघड काम मी माझ्या आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी करत आहे. त्याचे पंचेस सहन करण्याची सवय करत आहे.”

याआधी उर्वशीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती लेग पंचेस करताना दिसत होती. यावरून अगदी सहज लक्षात येते की, उर्वशी लवकरच एका ऍक्शन सिनेमात दमदार ऍक्शन करताना दिसणार आहे. उर्वशीचा हा व्हिडिओ खूप पहिला जात असून, त्याला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. उर्वशीचा नक्की कोणता ऍक्शन सिनेमा येणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेनेलियासोबत रितेश करत होता रोमान्स; तिचा हात समजून केले ‘या’ दिग्दर्शकाच्या हातावर किस, पुढं काय झालं पाहाच…

-बॉलिवूडमधील ‘काटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाचे विमानतळावर पतीला खास सरप्राईझ; नेटकरी म्हणाले, ‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.