तेजस्वीला घर खरेदी करून देण्यात करण कुंद्राचा मोठा हात? आगपाखड करत अभिनेता म्हणाला, ‘ती माझ्या…’

0
103
Karan-Kundra-And-Tejasswi-Prakash
Photo Courtesy: Instagram/kkundrra

छोट्या पडद्यावर असे काही कलाकार असतात, ज्यांचे चाहते त्यांच्याबद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. यामध्ये अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश या जोडीचाही समावेश होतो. या जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते रांगा लावतात. अशातच तेजस्वीच्या नवीन घरेदी करण्याच्या बातम्या आणि फोटो आले, तेव्हा यावर अनेक प्रश्नांचा भडीमार झाला. काहींनी असेही म्हटले की, तेजस्वीने करणच्या पैशांनी हे घर खरेदी केले आहे का? आता एका ट्वीटचे प्रत्युत्तर देताना करणने खरं काय ते स्पष्ट केले आहे.

करण कुंद्राचे सडेतोड प्रत्युत्तर
तेजस्वीच्या घरात काढलेले फोटो व्हायरल झाले, तेव्हा एकाने विचारले की, घर किती बीएचकेचे आहे? तसेच, आणखी एकाने विचारले की, पैसे कोणत्या माध्यमातून आले? आताही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे दोघेही सोबत दिसत आहेत. यामध्ये पॅपराजी वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत की, घर खरेदी करण्यासाठी  करणने पैसे दिले का? या सर्व प्रश्नांवर तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिने शांत राहणेच योग्य समजले. मात्र, एका युजरने विचारलेल्या प्रश्नावर करण कुंद्रा (Karan Kundrra) याने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. करणला जेव्हा विचारण्यात आले की, त्याने घर विकत घेतले आहे का? त्यावर करण म्हणाला की, “नाही.”

करणने दिल्या शुभेच्छा
करण कुंद्रा याने ट्वीट करत लिहिले की, “हे घर तेजस्वीने खरेदी केले आहे. ती माझ्याही पुढे चालते, माझ्या मागे नाही. तुदेखील असे केले पाहिजे.” तेजस्वीने जेव्हा घर खरेदी केल्यानंतर फोटो शेअर केले होते, तेव्हा करणने तिला शुभेच्छा देत लिहिले होते की, “शुभेच्छा बेबी, तू या सर्वांसाठी पात्र आहेस.”

‘बिग बॉस’नंतर बदलले नशीब
तेजस्वी प्रकाश हिने सर्वात वादग्रस्त आणि तितक्याच प्रसिद्ध असलेल्या ‘बिग बॉस’ या शोचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर तिने ‘नागिन’ आणि ‘लॉकअप’ यांसारख्या शोमध्ये झळकली. ‘बिग बॉस’नंतर तेजस्वी प्रकाशच्या कारकीर्दीचा आलेख वाढतच गेला. ती छोट्या पडद्यावर चांगलीच सक्रिय असून चाहत्यांची मने जिंकत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाऱ्याची एकच झुळूक अन् उर्फीचा खेळच खल्लास! सगळ्यांसमोर अशी झाली अभिनेत्रीची फजिती, नेटकरीही भडकले
म्हणून ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याला करता आले नाही बॉलिवूड पदार्पण, मिथुन चक्रवर्तीचा मुलगा होता कारण?
अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे अडचणीत, दहा वर्षापुर्वीच्या खटल्यात भरावा लागणार दहा लाखांचा दंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here