Saturday, June 15, 2024

अहंकाराने बर्बाद केलेलं ‘या’ अभिनेत्याचं करिअर, मजबुरीमुळे आली ‘हे’ काम करण्याची वेळ; एकदा वाचाच

बॉलिवूडचा इतिहास पाहिला, तर आपल्याला असे अनेक कलाकार मिळतील, जे एका रात्रीत स्टार झाले. मात्र, जेव्हा त्यांच्यात अहंकार आला, तेव्हा त्यांची कारकीर्द उद्ध्वस्तही झाली. असाच एक अभिनेता म्हणजे विशाल मल्होत्रा होय. विशाल अनेक सिनेमांमध्ये लागोपाठ दिसायचा. इतकेच नाही, तर त्याने बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्ससोबतही काम केले आहे. मात्र, त्याच्या एका चुकीने कारकीर्द संपवली. चला तर त्याच्याविषयी जाणून घेऊयात…

सलमान खान आणि शाहिद कपूरसोबत केले काम
विशाल मल्होत्रा (Vishal Malhotra) हा अनेक सिनेमांमध्ये झळकला आहे. या सिनेमांमध्ये सलमान खान (Salman Khan) याचा ‘सलाम-ए-इश्क’ आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) याच्या ‘इश्क विश्क’ या सिनेमांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त तो ‘एक विवाह ऐसा भी’, ‘शरारत’ आणि ‘क्या मस्त लाईफ है’ या मालिकांमध्येही झळकला होता. या मालिका आणि सिनेमांनी विशालची कारकीर्द शिखरावर पोहोचवली होती. एवढंच काय, तर त्याला अनेक सिनेमांमध्येही भूमिका मिळू लागल्या होत्या. यानंतर त्याने एक मोठी चूक केली, ज्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर राहिला.

कोणती चूक केली?
माध्यमांतील वृत्तांनुसार, विशालला अहंकार आला होता. त्याचे म्हणणे होते की, तो एकसारख्या भूमिका करून दमला आहे. त्याला काहीतरी वेगळे करायचे होते. याच हट्टापायी त्याला निर्मात्यांनी सिनेमात काम देणे बंद केले. पाहता-पाहता त्याला ऑफर मिळणेही बंद झाल्या.

सिनेमाचा मार्ग विशालसाठी कायमचे बंद झाले होते. त्यामुळे तो अनेक वर्षे घरी बसून होता. त्यानंतर विशालने जाहिरात एजन्सी सुरू केली. यादरम्यान एका मुलाखतीत त्याने म्हटले होते की, “लोक अभिनेता बनण्यासाठी नोकरी सोडतात आणि मी अभिनेता बनण्यासाठी नोकरी करत आहे.”

अनेक वर्षांनंतर पुनरागमन
विशालने 12 वर्षांनंतर अभिनय कारकीर्दीत पुनरागमन केले आणि तो आता अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. त्याच्या जाहिरात एजन्सीची उलाढाल ही 4 ते 5 कोटी रुपयांची आहे. सध्या अभिनेता सोशल मीडियावर जोरदार सक्रिय आहे. त्याला इंस्टाग्राामवर 1 लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. याद्वारे तो त्याच्या कामासंबंधित किंवा वैयक्तिक आयुष्यासंबंधित पोस्ट शेअर करत चाहत्यांशी जोडलेला असतो. (ego runied salman khan and shahid kapoor co actor vishal malhotra career leaves industry now become director know here)

हेही वाचा-
सैफच्या अमृतासोबत गुपचूप लग्नाबाबत आई शर्मिलाचा खुलासा; म्हणाली, ‘त्याने घाईघाईने…’

‘या’ बॉलिवूड जोडप्याला देशाबाहेर कुणीही ओळखत नाही! स्वत:च स्वत:चे सामान उचलून निघाले कलाकार, Video

हे देखील वाचा