Friday, March 29, 2024

‘तुम्हाला श्रद्धांजली देऊ नाही शकत’, सुबाेध भावे का म्हणाले असं?

बॉलिवूड आणि टीव्हीचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. अनेक दिवस ते रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. विक्रम गाेखले त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जायचे. त्यांनी अनेक दमदार चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. साेशल मीडियावर अनेक कलाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (subodh bhave) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने पाेस्ट शेअर करत लिहिले की, “विक्रम गोखले सर… ज्यांनी मराठी कलाकृती श्रीमंत केली त्यातले तुम्ही एक महत्त्वाचे शिलेदार आहात.”

सुबाेध भावे याने विक्रम गाेखलेंसाेबत ‘अनुमती’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुबाेध व्यतिरिक्त विजू माने, नाना पाटेकर, मुक्ता बर्वे, प्रशांत दामले यासह अनेक कलाकारांनी विक्रम गाेखले यांना श्रद्धांजली वाहिली.

विक्रम गाेखले यांच्या कारकीर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परवाना’ या चित्रपटातून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘भूल भुलैया’, ‘दे दना दन’, ‘बँग बँग’, ‘स्वर्ग नरक’, ‘इन्साफ’, ‘आंदोलन’, ‘अय्यारी’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगल’ यासारखी दमदार चित्रपट त्यांनी बाॅलिवूडला दिली. त्याचबरोबर तो छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्येही दिसले. त्यांनी ‘सिंहासन’, ‘मेरा नाम करेगी रोशन’, ‘उडान’, ‘इंद्रधनुष’, ‘क्षितिज ये नही’, ‘संजीवनी’, ‘जीवन साथी’, यासारख्या प्रसिद्ध मालिकेत काम केले. सण 2010 साली त्यांनी दिग्दर्शक म्हणून ‘घट’ हा मराठी चित्रपट बनवला. त्याचसाेबत त्यांना रंगभूमीवरील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. (actor subodh bhave shared post regarding bollywood veteran actor vikram gokhale)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मलायका अरोराने फ्लॉन्ट केला हकटे लूक, सोशल मीडियावर फोटो होतोय तुफान व्हायरल

‘आयुष्य अपूर्ण आहे मित्रा…’,अनुपम खेर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट

हे देखील वाचा