Sunday, December 8, 2024
Home मराठी रामायण पुन्हा एकदा उलगडलं जाणार, ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत रामाची भुमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

रामायण पुन्हा एकदा उलगडलं जाणार, ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत रामाची भुमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

कोट्यावधी भारतीयांचे दैवत असलेला श्रीराम हा शौर्य आणि सदगुणांचा पुतळा आहे. अशा या भगवान श्रीरामाची कथा सच्चेपणाने आणि विशुद्ध रूपात सादर करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे मालिका ‘श्रीमद् रामायण’. ही मालिका 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9.00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

पौराणिक मालिका प्रत्येक भारतीय कुटुंबाला एका प्राचीन काळात घेऊन जाईल, ज्या काळात प्रभावी स्वरूपात अस्तित्त्वात असलेली जीवनमूल्ये आणि शिकवण आजच्या काळात देखील सुसंबद्ध आहे. या वाहिनीने सदर मालिकेचा एक नवीन प्रोमो दाखल केला आहे, ज्यामध्ये हे उघड झाले आहे की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता आहे, सुजय रेऊ(Sujay Reu).

आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका साकारत असलेला सुजय रेऊ या भूमिकेबद्दल म्हणतो, ‘श्रीमद् रामायण’ मालिकेत ही भूमिका मिळणे हा मी माझा गौरव मानतो. कोट्यावधी लोकांचे आराध्य दैवत असलेली ही देवता म्हणजे केवळ एक भूमिका नाही. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि एका आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. प्रभू श्रीरामाची कथा अनेक भारतीयांप्रमाणे माझ्यासाठीही जिव्हाळ्याचा विषय आहे. श्रीराम कथा पडद्यावर जिवंत करणे हे माझ्यासाठी स्वप्न साकार होत असल्यासारखे आहे.”

‘श्रीमद् रामायण’ (Shrimad Ramayana) सुरू होत आहे, 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर. (Actor Sujay Reu will play the role of Rama in the serial Shrimad Ramayana)

आधिक वाचा-
‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्मा हिच्या हटके अदा; फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा
फक्त ‘किंग खानच’ नाही तर ‘या’ स्टार्सने देखील केलंय इंटरकास्ट मॅरेज; वाचा यादी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा