Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड पत्रकार विचारत होता प्रश्न, तेवढ्यात अचानक रागाने ओरडला सनी देओल; उपस्थितांमध्ये पसरली भयान शांतता

पत्रकार विचारत होता प्रश्न, तेवढ्यात अचानक रागाने ओरडला सनी देओल; उपस्थितांमध्ये पसरली भयान शांतता

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे त्यांच्या दमदार भूमिकांसाठी ओळखले जात आहेत. त्यापैकीच एक आहे अभिनेता सनी देओल. सनीने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयाला चाहत्यांची तुफान प्रसिद्धी मिळते. अशात जवळपास 3 वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असणारा सनी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. त्याचा ‘चुप’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सिनेमाच्या प्रमोशनशी संबंधित एका मुलाखतीदरम्यान सनीने असं काही केलं की, ज्याने सर्वच घाबरले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

रागाने ओरडला सनी देओल
झाले असे की, ‘चुप’ (Chup) सिनेमाच्या कलाकारांची पत्रकार परिषद सुरू होती. यावेळी पत्रकार आपापले प्रश्न विचारत होते, तेवढ्यात हातात माईक पकडून सनी देओल (Sunny Deol) रागाने ओरडला आणि त्याने सर्वांनाच ओरडून शांत केले. यावेळी सर्वत्र भयान शांतता पसरली होती. सनीचा दमदार आवाज ऐकून प्रत्येकजण दंग झाला आणि काही सेकंदासाठी कुणालाच काही समजले नाही की, काय झाले आहे. मात्र, नंतर सनी लगेच खळखळून हसू लागला आणि प्रत्येकाला समजले की, तो त्याच्या सिनेमाचे प्रमोशन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Elite (@eliteshowbiz)

‘चुप’ कधी होणार प्रदर्शित?
सनी देओल याचा ‘चुप’ (Sunny Deol Chup Movie) हा सिनेमा येत्या 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सनी देओलव्यतिरिक्त दुलकर सलमान, पूजा भट्ट यांसारख्या दमदार कलाकारांचाही समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dulquer Salmaan (@dqsalmaan)

तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता सिनेमा
सनी देओल बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एन्ट्री करणार आहे. यापूर्वी तो तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019मध्ये ‘ब्लँक’ या सिनेमात झळकला होता. यापूर्वी तो 2018मध्ये ‘यमला पगला दीवाना फिर’मध्ये भाऊ बॉबी देओल आणि वडील धर्मेंद्र यांच्यासोबत झळकला होता. विशेष म्हणजे, सनीने 2019मध्ये ‘पल पल दिल के पास’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. यामधून सनीचा मुलगा करण देओल याने बॉलिवूड पदार्पण केले होते. सध्या सनी त्याच्या ‘अपने 2’ या सिनेमामुळे चर्चेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझ्या गाडीचा ब्रेक फेल केला, विष देऊन मारण्याचाही प्रयत्न झाला…’ अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक खुलासा
सोशल मीडियावर व्हायरल होतोय राजूंचा शेवटचा व्हिडिओ, कुटुंबासोबत गाणे गाताना दिसले कॉमेडियन
वडिलांसमान राजूंच्या अंत्यसंस्काराला भाऊच होता गैरहजर, कारण जाणून तुम्हीही व्हाल भावूक

हे देखील वाचा