सोशल मीडियावर व्हायरल होतोय राजूंचा शेवटचा व्हिडिओ, कुटुंबासोबत गाणे गाताना दिसले कॉमेडियन

0
78
Raju-Srivastava-Family
Photo Courtesy: Instagram/rajusrivastavaofficial

सर्वांना हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव अनंतात विलीन झाले. त्यांनी बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) सकाळी जगाचा निरोप घेतला. ते 58 वर्षांचे होते. 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना लगेच दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते पुढील 41 दिवस मृत्यूशी झुंज देत राहिले. मात्र, शेवटी ते या लढाईत अपयशी ठरले. बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्व क्षेत्रांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अशातच त्यांचा कुटुंबीयांसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेवटचा व्हिडिओ
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava) यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओत ते एका कौटुंबिक कार्यक्रमात मजा-मस्ती करताना दिसत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा व्हिडिओ राजू रुग्णालयात दाखल होण्याच्या 15 दिवसांपूर्वीचा आहे. त्यांची तब्येत बिघडण्याच्या 15 दिवसांपूर्वी ते लखनऊमधील राजाजीपुरममध्ये आपल्या एका नातेवाईकांच्या घरातील लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांनी नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवला. त्यासोबतच त्यांनी ‘रिमझिम गिरे सावन’ हे गाणेही गायले.

जिममध्ये वर्कआऊट करताना बेशुद्ध
राजूंच्या निधनानंतर आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण भावूक होत आहे. सोबतच त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहत आहेत. खरं तर, राजू  हे 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करताना अचानक बेशुद्ध झाले होते. त्यानंतर त्यांना लगेच दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर सांगितले की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर ते तब्बल 41 दिवसांपासून बेशुद्धच होते. अशात प्रत्येकजण त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत होता. मात्र, शेवटी राजू यांनी या जगाचा निरोप घेतला.

सुरुवातीला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मिमिक्री करून राजू देशभरात प्रसिद्ध झाले होते. त्यासाठी त्यांना 50 रुपयांचं बक्षिसही मिळाले होते. त्यांनी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या मंचावर आपला विनोद सादर करून घराघरात ओळख मिळवली होती. त्यांनी स्टँडअप कॉमेडीव्यतिरिक्त अनेक सिनेमातही काम केले. त्यामध्ये ‘बॉम्बे टू गोवा’, ‘भावनाओं को समझो’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’, ‘मैंने प्यार किया’ यांसारख्या अनेक सिनेमात काम केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वडिलांसमान राजूंच्या अंत्यसंस्काराला भाऊच होता गैरहजर, कारण जाणून तुम्हीही व्हाल भावूक
बॉलिवूडने दमदार अभिनेत्री गमावली! डायरेक्टरच्या घाणेरड्या मागणीमुळे ‘या’ ऍक्ट्रेसने घेतला मोठा निर्णय
हुमा कुरेशीने कपिल शर्मासाठी गायले ‘हे’ गाणे; हसून हसून प्रेक्षकही झाले लोटपोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here