Wednesday, April 24, 2024

वडिलांसमान राजूंच्या अंत्यसंस्काराला भाऊच होता गैरहजर, कारण जाणून तुम्हीही व्हाल भावूक

मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर मोठा आघात झाला. चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. आता राजू अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्यावर गुरुवारी (दि. 22 सप्टेंबर) दिल्लीच्या निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार झाले. राजू यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांची पत्नी, मुलगी अंतरासह अनेक मित्र आणि चाहते पोहोचले होते. मात्र, यावेळी त्यांचा भाऊ काजू श्रीवास्तव हे गैरहजर होते. काय होते यामागील कारण?, चला जाणून घेऊया…

काजूने का नाही लावली राजूंच्या अंत्यसंस्काराला हजेरी?
झाले असे की, राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे भाऊ काजू श्रीवास्तव (Kaju Srivastava) हेदेखील आजारी आहेत. जेव्हा राजू दिल्लीच्या एम्समध्ये दाखल झाले होते, तेव्हा त्यांच्यासोबत काजूही या रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. राजूंचे निधन झाले, पण काजू सुदैवाने सुखरूप घरी परतले. मात्र, ते अजूनही आजारी आहेत. माध्यमांतील माहितीनुसार, काजू यावेळी गरोदर पत्नीसोबत कानपूरमध्ये आहेत.

आजारपणामुळे ते इच्छा असूनही भावाला शेवटचा निरोप देण्यासाठी दिल्लीला पोहोचू शकले नाहीत. त्यांच्यासाठी हा निर्णय घेणे सोपे नव्हते. आयुष्यातील इतके वर्षे, एकमेकांसोबत घालवल्यानंतर आपल्या वडिलांसमान भावाला शेवटचा निरोप देऊ न शकणे, हे खूपच कठीण आहे. मात्र, परिस्थितीसमोर हतबल काजूंना हा निर्णय घ्यावा लागला. हाती आलेल्या वृत्तानुसार, लोक कानपूरमध्ये काजू यांच्या घराबाहेर जमा होत आहेत. तसेच, आपल्या संवेदनाही व्यक्त करत आहेत.

दुसरीकडे, दिल्लीमध्ये कॉमेडियन सुनील पाल आणि एहसान कुरेशी दिवंगत कॉमेडियनला शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “त्यांची आठवण सदैव काढली जाईल. ते आमचे गुरू होते.” राजूंनी 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. मागील 41 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजूंनी सर्वांचा निरोप घेतला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बॉलिवूडने दमदार अभिनेत्री गमावली! डायरेक्टरच्या घाणेरड्या मागणीमुळे ‘या’ ऍक्ट्रेसने घेतला मोठा निर्णय
हुमा कुरेशीने कपिल शर्मासाठी गायले ‘हे’ गाणे; हसून हसून प्रेक्षकही झाले लोटपोट
बापरे बाप! लोकप्रिय गायकाने सेल्फी काढायला आलेल्या चाहतीलाच केले किस, व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा