Monday, September 25, 2023

‘ही मूर्खांची दुनिया, हिंमत असेल तर…’, ट्रोलर्सवर कडाडला ‘तारा सिंग’

सध्या गल्ली ते दिल्ली एका सिनेमाची चर्चा चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. हा सिनेमा इतर कोणताही नसून ‘गदर 2‘ आहे. प्रसिद्ध अभिनेता सनी देओल त्याच्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. हा सिनेमा येत्या 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सनी देओल वाहवा लुटत आहे. अशातच सनीने सोशल मीडियावर ट्रोलर्सचा सामना कशाप्रकारे करतो, याबाबत सांगितले आहे.

काय म्हणाला सनी देओल?
सोशल मीडियाचा काळ असल्याने ट्रोलर्स वाटेल ते बोलून टाकतात. अशात सनी देओल (Sunny Deol) म्हणाला आहे की, तो या ट्रोलर्सला अजिबात घाबरत नाही. नुकतेच एका मुलाखतीत ‘तारा सिंग’ (Tara Singh) भूमिका साकारणाऱ्या सनीने सांगितले की, तो कशाप्रकारे ट्रोलर्सचा सामना करतो.

सनी देओलने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी ट्रोलिंगला घाबरत नाही. ते चेहरे नाहीयेत, ते भित्रे लोक आहेत, जे लिहीत आहेत. त्यांच्याकडे काहीही काम नसते, त्यामुळ ते लिहितात. या मूर्खांच्या दुनियेत लोक एकमेकांना मूर्ख बनवतात. तंत्रज्ञानाचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहेत. काही लोक नेहमी गैरवापर करतात. माझ्याविषयी ट्रोलिंग होत होती, त्यामुळे मी कमेंट्स बंद केल्या. कोणाची हिंमत असेल, तर समोर येऊन बोला.”

सनी देओलचा चाहतावर्ग हा भारताव्यतिरिक्त जगभरात पसरला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानमध्येही सनीचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘गदर’ सिनेमा आला होता, तेव्हा असे बोलले जात होते की, सनीचा हा सिनेमा पाकिस्तानी लोकांना आवडला नाही. मात्र, असे नाहीये. तिथेही सनी देओलच्या चाहत्यांना हा सिनेमा आवडला होता.

तो मुलाखतीत म्हणाला होता की, “खऱ्या जनतेत हा माहोल नाहीये. जेव्हा मी पाकिस्तानला जातो, तेथील चाहत्यांना भेटतो, तेव्हा ते गळाभेट घेतात. मागील काही दिवसांपूर्वी काही बोललो, तर लोकांनी चुकीचा अर्थ घेतला.”

‘गदर 2’ सिनेमा
सनी देओलचा ‘गदर’ सिनेमा 2001मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने चांगलीच वाहवा लुटली होती. अशात 22 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग ‘गदर 2’ (Gadar 2) रिलीज होतोय. या सिनेमातही सनी देओल आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) मुख्य भूमिकेत आहेत. जवळपास 75 कोटी बजेट असलेल्या या सिनेमात त्यांच्याव्यतिरिक्त उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, मनीष वाधवा, लव्ह सिन्हा, गौरव चोप्रा यांसारख्या कलाकारांचाही समावेश आहे. (actor sunny deol furious on trollers on gadar 2 promotion know here)

हेही वाचा-
Dada Kondke | मनोरंजनाचा वादा म्हणजेच ‘दादा’
‘पुष्पा’मधील भंवर सिंगने ‘अशी’ केली होती करिअरला सुरुवात, इरफान खानच्या चित्रपटाने मिळालेली प्रेरणा

हे देखील वाचा