रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र‘ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली आहे. यादरम्यान, सुशांत सिंग राजपूत याची बहीण मीतू सिंग हिने ‘ब्रह्मास्त्र’वर आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे कमेंट केली आहे.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या चित्रपटाची खिल्ली उडवत मीतूने लिहिले की, “या बॉलिवूडला उद्ध्वस्त करण्यासाठी एकट्या सुशांतचे ब्राम्हस्त्र पुरेसे होते. बॉलिवूड नेहमीच जनतेवर हक्क गाजवायला पाहतो, हा परस्पर आदर आणि नम्रता दाखवण्यासाठी कधीही थांबत नाही.”
मीतू सिंगने लिहिले, “आपण अशा लोकांना आपल्या देशाचा चेहरा कसा बनवू शकतो, जो नैतिक मूल्यांनी समृद्ध आहे? जनतेचे प्रेम आणि देखावा जिंकण्याचा त्यांचा खेदजनक प्रयत्न अयशस्वी ठरला. गुणवत्ता आणि नैतिक मूल्ये या एकमेव गोष्टी आहेत ज्यामुळे प्रशंसा आणि आदर मिळतो.” मीतू सिंगच्या या पोस्टवर सुशांत सिंग राजपूतचे (Sushant Singh Rajput) चाहते पुन्हा एकदा खडबडून जागे झाले आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, “तुम्ही अगदी बरोबर आहात.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “सुशांत सिंग राजपूत तुम्ही जगावर राज्य करत आहात. ही इंडस्ट्री लवकरच कोसळेल.”
View this post on Instagram
सुशांत सिंग राजपूत 14 जून, 2020 रोजी त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर, इंडस्ट्रीमध्ये केवळ नेपोटिझमचीच चर्चा झालीच, शिवाय अं’मली पदार्थांच्या रॅकेटचाही पर्दाफाश झाला. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचे चाहते सतत बॉलिवूड चित्रपटांना लक्ष्य करत आहेत आणि सोशल मीडियावर बॉयकॉट टाकत आहेत.
दुसरीकडे, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणबीर-आलियाशिवाय अभिनेते अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने पहिल्या दिवशी 36 कोटींचा व्यवसाय केला आहे. हा रणबीरच्या कारकीर्दीतला पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा बनला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या भागात दीपिका बनणार रणबीरची आई? सिनेमातील ‘या’ सीनमधून मिळाली हिंट
ट्रेलर नंतर गुडबाय चित्रपटातील पहिले गाणे या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सोज्वळ करिश्मा कपूरच्या बोल्ड फोटोंनी वाढला नेटकऱ्यांचा पारा, म्हणाले, ‘तुझं आता सगळं…’