Thursday, July 18, 2024

सुशांतच्या आठवणीत ढसाढसा रडली अंकिता, उषा नाडकर्णींच्याही डोळ्यात तरळले अश्रू; व्हिडिओ जोरदार व्हायरल

पवित्र रिश्ता‘ या मालिकेतून प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आकस्मिक मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले होते. छाेट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या सुशांतच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांपासून ते जवळच्या मित्रांपर्यंत सर्वजण त्याची आठवण काढून भावूक होतात. मात्र, अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे सुशांतसोबत खूप जवळचे नाते हाेते. अशातच डीआयडीच्या शाेमध्ये सुशांतच्या आठवणीत अंकिताही भावूक हाेताना दिसली.

‘डीआयडी सुपर मॉम’ शोचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. झाले असे की, डीआयडीच्या शाेमध्ये सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याला श्रद्धांजली वाहत एका स्पर्धकाने डान्स परफॉर्मन्स दिला होता, जो पाहून अंकिता लाेखंडे (Ankita Lokhande) आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. व्हिडिओमध्ये स्पर्धक साधना आणि तिची कोरिओग्राफर स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहेत. हे पाहून अंकिता खूपच रडताना दिसत आहे.

परफॉर्मन्स पाहिल्यानंतर अंकिता भावनिक हाेऊन म्हणाली की, “तो माझा खूप जवळचा मित्र होता…तो जिथे कुठे आहे…  खूप आनंदी आहे, याची मला खात्री आहे.” त्याचप्रमाणे पवित्र रिश्तामध्ये अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यादेखील शोमध्ये उपस्थित होत्या. दोघांमध्ये खूप चांगले बॉन्ड होते. उषा नाडकर्णी यादेखील सुशांतच्या आठवणीत अश्रू अनावर झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE TV (@zeetv)

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक झाले. त्यावर प्रतिक्रिया देत एका युजरने लिहिले की, “यार परत रडवलंस.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सुशांत सर आम्ही तुम्हाला खूप मिस करतो.” मात्र, अनेक युजर्स अंकिताला ट्रोल करताना दिसले की, एकाने लिहिले की, “भावनिक होणे हे सर्व केवळ प्रसिद्धीसाठी आहे.”

सुशांत सिंग राजपूत हा 2020 मध्ये त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचे कारण त्याच्या मित्रांना आणि चाहत्यांना अजून कळलेले नाही. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेमध्ये काम करताना सुशांत आणि अंकिता लोखंडे यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात. मात्र, लग्नापर्यत गाेष्ट पाेहचण्याआधी त्यांचे ब्रेकअप झाले. अंकिताने गेल्या वर्षी व्यावसायिक विकी जैन याच्यासोबत लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एक-दोन नाही, तर पवन कल्याणने ३ वेळा थाटलाय संसार; संपत्तीचा आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी!
कार्तिक आर्यनचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘एका फ्लॉप सिनेमाने माझे करिअर संपेल…’
कपिल शर्मानंतर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटात दीपिकाची एंट्री, लूक पाहून चाहते फिदा

हे देखील वाचा