Monday, May 13, 2024

बाकीच्यांचं सोडा, रणबीरच्या आईनेच सांगितले कसा वाटला ‘ब्रह्मास्त्र’, म्हणाली, ‘चित्रपट लय भारी, पण…’

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ शुक्रवारी (दि. 9 सप्टेंबर) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार,
या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात जवळपास 75 कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी, आता रणबीर कपूरची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाबद्दल आपला रिव्ह्यू दिला आहे.

नीतू कपूर (Neetu Kapoor) याने ‘ब्रह्मास्त्र’च्या (Brahmastra) स्क्रिनिंगवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukerji) यांच्याशी संवाद साधताना या चित्रपटाविषयी आपला रिव्ह्यू दिला आहे. नीतू आणि अयानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी (दि. 08 सप्टेंबर) रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि नीतू कपूर यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि जवळच्या मित्रांसाठी ‘ब्रह्मास्त्र’चे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. त्यादरम्यान, नीतू कपूर यांनी चित्रपटाबद्दल रिव्ह्यू दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

या व्हिडिओमध्ये नीतू कपूर अयान मुखर्जीशी चित्रपटाबद्दल बोलत आहेत की, “सिनेमा शेवटी रंजक आणि शानदार आहे, पण सुरुवातीला सिनेमा जेव्हा सुरू होतो, तेव्हा तो बनवण्यास वेळ लागत असतो.” व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अयान मुखर्जी नीतू कपूरचे म्हणणे अत्यंत गांभीर्याने ऐकताना दिसत आहे. या व्हिडिओत पुढील गोष्ट कॅमेऱ्यात कैद होऊ शकले नसले, तरी एकंदरीत अभिनेत्रीला हा चित्रपट आवडल्याचे स्पष्ट झाले आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि दिव्येंदू शर्मा देखील दिसत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानची (Shahrukh Khan) कॅमिओ भूमिका पाहायला मिळत आहे. 410 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची बरीच एडवांस बुकिंग झाली असून प्रेक्षक चित्रपट बघण्यासाठी उत्सुक आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सोज्वळ करिश्मा कपूरच्या बोल्ड फोटोंनी वाढला नेटकऱ्यांचा पारा, म्हणाले, ‘तुझं आता सगळं…’
कार्तिक आर्यनच्या करिअरची गाडी एकदम सुसाट! ‘या’ आगामी चित्रपटांची भलीमोठी यादी एकदा पहाच

विकी कौशलने कॅटरिनासोबत केले ‘असे’ काही की; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘नक्की काय करायचं बाबा’

हे देखील वाचा