प्रत्येकाचे आयुष्य भन्नाट किस्स्यांनी भरलेलं असते. बॉलिवूड कलाकारांचे आयुष्यात तर किस्स्यांची कसलीच कमतरता नसते. त्यांच्या प्रत्येक सिनेमातील भन्नाट, विचित्र, चांगले किस्से आपल्यापर्यंत येत असतात. मात्र, यापेक्षा जास्त लक्षवेधी किस्से हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील असतात. असाच एक किस्सा अभिनेता तुषार कपूर याच्यासोबत घडला होता. तुषार कपूर लहानपणी डिज्नीलँडमध्ये हरवला होता. विशेष म्हणजे, त्यावेळी तो फक्त 5 वर्षांचा होता. त्यानंतर तो कसा भेटला, हे त्याने स्वत:च सांगितला होता.
काय म्हणाला तुषार?
दिग्गज अभिनेते जितेंद्र (Jeetendra) यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता तुषार कपूर (Tusshar Kapoor) याने लहान असताना हरवल्याचा किस्सा सांगितला. तो म्हणाला की, “1982मध्ये मी डिज्नीलँडमध्ये हरवलो होतो. मी फक्त 5 वर्षांचा होतो. मला ट्रेन पकडण्यात उशीर झाला आणि माझ्या कुटुंबाने पहिल्या ट्रेनमध्ये आपले सीटही घेतल्या होत्या.”
पुढे बोलताना तुषार सांगतो की, जर त्याचे वडील त्याला शोधायला आले नसते, तर तो त्याच्या कुटुंबाला कधीच भेटला नसता. तो म्हणाला की, “मीदेखील त्यांना शोधत होतो आणि माझे वडील मला शोधत शोधत परत आले. मला वाटते की, जर ते त्यावेळी योग्य वेळी पोहोचले नसते, तर आज मी इथे बसलो नसतो.”
View this post on Instagram
जितेंद्र यांनी ‘इंडियन आयडल 13’च्या ‘जितेंद्र जी स्पेशल’ या एपिसोडमध्ये पाहुण्या कलाकाराच्या रूपात हजेरी लावली आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता तुषार कपूरनेही या शोमध्ये वडिलांच्या उपस्थितीवर आनंद व्यक्त करत त्यांच्यासाठी एक व्हिडिओ मेसेज शेअर केला. या व्हिडिओत तुषार म्हणतो की, “मी त्यांना इंडियन आयडलमध्ये पाहून खुश आहे. कारण, हा त्यांचा आवडीचा शो आहे. मला आशा आहे की, तुम्ही शोचा आनंद घ्याल आणि तुमच्याकडे चांगला वेळ असेल.”
तुषार कपूर सध्या त्याच्या ‘मारीच’ या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तो पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलांना ओळखलं का? त्यांनी मोठेपणी गाजवलंय बॉलिवूड, मुली अन् सुनबाईही आहेत स्टार
‘वजन कमी कर जाड झालीयेस’, लेटेस्ट व्हिडिओत कंबर लचकवणाऱ्या सपनाच्या पोस्टवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट