बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Natasha Dalal) आणि नताशा दलाल यांच्या घरात लवकरच आनंद पसरणार आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून पत्नीच्या गर्भधारणेची घोषणा केली आहे. वरुण धवनने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेता त्याची पत्नी नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. वरुण धवन लवकरच वडील होणार आहे.
या अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत. चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्सही या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. भूमी पेडणेकर, नेहा धुपिया, मौनी रॉय आणि करण जोहरसह अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.
वरुण धवनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आम्ही प्रेग्नंट आहोत. फक्त तुमचे आशीर्वाद आणि प्रेम हवे आहे.” मोनोक्रोम फोटोमध्ये वरुण नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.
नताशा आणि वरुण हे बालपणीचे मित्र आहेत. एका कॉन्सर्टदरम्यान दोघेही प्रेमात पडले. वरुण धवनने नताशाला तीनदा प्रपोज केले होते. नताशाने त्याला दोनदा नाही सांगितले होते. वरुण धवन आणि नताशा दलाल यांचे २०२१ साली लग्न झाले. हे जोडपे लवकरच आई-वडील होणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
मृत्यूची खोटी बातमी देणारी पोस्ट डिलीट करून पूनम पांडेने दिले नवे अपडेट, लोकांनी केला संताप व्यक्त
जलसाच्या बाहेर चाहत्यांना भेटल्यावर बिग बी झाले भावूक म्हणाले, ‘हे नसेल तर काही नाही’