शूटिंग दरम्यान चाहत्यांची गर्दी, वैतागलेल्या अवस्थेतही वरुणने अत्यंत प्रेमाने केली विनंती, व्हिडिओ व्हायरल

Actor Varun Dhawan request to all his fans for not disturbing and let them complete shooting


लाखो तरुणींच्या गळ्यातलं ताईत म्हणजे बॉलिवूड मधील सुपरस्टार वरुण धवन. आपला दमदार अभिनय आणि डॅशिंग व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर तो प्रत्येकाच्या मनावर राज्य करत असतो. आजपर्यंत वरुणने अनेक रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटात काम केले आहे. परंतु वरुण त्याच्या आगामी हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्या दोघांचा ‘भेडिया’ चित्रपट लवकरच रिलीझ होणार आहे. या चित्रपटाची शूटिंग अरुणाचल प्रदेशात सुरू आहे. याच शूटिंगच्या दरम्यान झालेला एक किस्सा वरुणने शेअर केला आहे.

वरुण धवनच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो चाहत्यांच्या गर्दीला शांत करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो ज्या पद्धतीने गर्दीला शांत करत आहे. ते खूपच मजेशीर आहे. वरुण धवन त्याच्या गाडीवर उभा राहून सगळ्यांना शांत करताना दिसत आहे. तो सगळयांना विनंती करतो की, “शूटिंग अजून बाकी आहे, आणि आम्ही अजून काही दिवस इथेच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही आता इथे गर्दी करू नका. आम्हाला शूटिंग पूर्ण करू द्या.” परंतु त्याचे सगळे चाहते मोबाईलची टॉर्च लावून खूप गोंधळ करत होते.

‘भेडिया’ या चित्रपटात वरुण एका वेअरवोल्फची भूमिका निभावणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. हा चित्रपट पुढच्या वर्षी 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टिजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात वरुण अत्यंत भयानक दिसतोय.

‘भेडिया’ हा चित्रपट हॉरर फिल्म युनिव्हर्सचा एक भाग आहे. हा चित्रपट ‘अमर कौशिक’ यांनी दिग्दर्शित केला आहे. लवकरच प्रदर्शित होणारे ‘स्त्री’ आणि ‘रुही’ हेदेखील हॉरर फिल्म युनिव्हर्सचा भाग आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ग्रीक गॉड’ ऋतिक रोशनचे आलिशान घर पाहून तुम्हीही व्हाल थक्क, एकदा पाहाच

-खेसारी लालच्या ‘इश्क’ गाण्याची जादू आजही प्रेक्षकांवर कायम, मिळालेत २ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

-बॅडमिंटन स्टार ‘सायना’च्या बायोपिकमध्ये परिणीती मुख्य भूमिकेत, ट्रेलरला मिळतंय भरभरून प्रेम


Leave A Reply

Your email address will not be published.