खेसारी लालच्या ‘इश्क’ गाण्याची जादू आजही प्रेक्षकांवर कायम, मिळालेत २ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

Bhojpuri singer khesari lal Yadav's Ishq song viral


भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवची भुरळ तर आज संपूर्ण भारतात आहे. भोजपुरी चित्रपटाचे चाहते त्याच्या अभिनयासोबत त्याच्या लूकचे देखील दिवाणे आहेत. खेसारी लालचे नाव ज्या गाण्यासोबत जोडले जात ते गाणे सुपरहिट होणार, यात कसलीच शंका नसते. मागच्या वर्षीपासून त्याच्या लोकप्रियतेमध्ये भलतीच वाढ झालेली दिसत आहे. त्याच्या गाण्यासोबतच त्याच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्याचे मागील वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या एका गाण्याला चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली आहे. आता ते पुन्हा एकदा इंटरनेटवर राडा घालताना दिसत आहे.

दिनांक 25 डिसेंबर 2020 स्पीड रेकॉर्ड्स भोजपुरीच्या यूट्यूब चॅनेलवर त्याचे ‘इश्क’ हे गाणे रिलीझ केले होते. पण आजही ते गाणे सगळ्यांच्या आवडीचे आहे. त्याचे हे गाणे हिंदीमध्ये होते. या गाण्यातील खेसारी लालचे बोल, त्यांची स्टाईल दर्शकांना खूपच आवडली होती.

“मैं इश्क हू बुखार नहीं जो दवा से उतर जाऊंगा” हे त्याच्या गाण्याचे बोल होते. तरुण पिढीला आपलेसे करणार हे गाणे खूप कमी वेळात लोकप्रिय झाले होते.गाण्यातील व्हॉट्सॲप या शब्दाने ते सगळ्यांना खूपच भावले. या गाण्यात खेसारी लाल हा वेगळ्याच अंदाजात होता, जो याआधी कधीच दिसला नव्हता. या गाण्याच्या सेटला रॅप म्युजिक व्हिडिओच्या सेटनुसार तयार केले आहे. या गाण्याच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही या गोष्टी वरूनच लावू शकता की, या गाण्याला 2 कोटींपेक्षाही अधिक वेळा पाहिले गेले आहे.

इश्क हे गाणे खेसारी लालने गायले आहे. कनिष्का नेगी हिने देखील या गाण्याला आपला आवाज दिला आहे. ‘यादव राज’ यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहले आहेत, तर विनय विनायक यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. दीपेश गोयल यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे, तर साहिल मासिहने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कल्लूचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ, प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

-कुणी तरी येणार येणार गं! कन्नड अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त भन्नाट फोटोशूट, इंस्टाग्रामवर झलक केली शेअर

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.