बॅडमिंटन स्टार ‘सायना’च्या बायोपिकमध्ये परिणीती मुख्य भूमिकेत, ट्रेलरला मिळतंय भरभरून प्रेम

Pariniti chopra new film's trailer release on woman's day


बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने 10 वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या कालावधीत तिने आपल्या अभिनयाने कोट्यवधी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनय आणि आपल्या गायनाने तिने चित्रपटसृष्टीत आपले नाव बनवले. तिने ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.तसेच तिने तीन गाणी देखील गायली आहेत. नुकताच तिच्या प्रदर्शित होणाऱ्या नवीन चित्रपटाची चर्चा आहे. तिच्या ‘सायना’ या चित्रपटाचा ट्रेलर जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर रिलीझ करण्यात आला आहे. सगळ्या प्रेक्षकांना तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर खूपच आवडत आहे. तसेच परिणीतीच्या अभिनयाचे देखील सर्वजण कौतुक करत आहेत. हा चित्रपट बॅडमिंटन स्टार ‘सायना नेहवाल’ हिच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये परिणीती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ट्रेलरमध्ये सायनाची लहानपणापासून ते तिच्या करिअरपर्यंतची सर्व कहाणी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर हे नक्कीच म्हणता येऊ शकते की, चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्यातील आत्मविश्वास नक्कीच वाढेल. ‘अमोल गुप्ते’ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात परिणीती चोप्रा सायनाची भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावताना दिसत आहे.

याआधी चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित केला होता. त्याला देखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. यातील एक डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला आहे.

तो डायलॉग हा होता की, “देशाची लोकसंख्या 100 कोटी आहे. त्यातील आर्धी तर महिलांची आहे. माझा मुलगा मस्त कॉलेजला जाणार आणि मुलगी घरात चूल फुंकत बसणार. अठरा वर्षांची होताच तिचे हात पिवळे होणार आणि मग काय कहाणी इथेच संपते, पण माझ्यासोबत असं नाही घडलं हातात तवा घेण्याच्या ऐवजी मी तलवार घेतली.” हा चित्रपट 27 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ‘मानव कौल’ हा सायनाच्या कोचच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कल्लूचं होळीवरील नवीन गाणं रिलीझ, प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

-कुणी तरी येणार येणार गं! कन्नड अभिनेत्रीचे महिला दिनानिमित्त भन्नाट फोटोशूट, इंस्टाग्रामवर झलक केली शेअर

-‘विकी कौशलने मला असे करण्यास भाग पाडलेे’, म्हणत समंथाने जबरदस्त व्हिडिओ केला शेअर


Leave A Reply

Your email address will not be published.