Thursday, March 30, 2023

बापरे! ब्रेकअप होऊनही रश्मिका मारते एक्स बॉयफ्रेंडच्या घरी चकरा, स्वत:च केला खुलासा

सध्या साऊथच्या एका अभिनेत्रीची बॉलिवूडमध्येही चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री इतर कुणी नसून ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे. रश्मिकाची गणना साऊथ इंडस्ट्रीच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये होते. तिच्या सिनेमांपेक्षा चाहते तिच्या अदांवर फिदा होताना दिसतात. अशातच ती तिच्या आगामी हिंदी सिनेमामुळे चर्चेत आहे. तिने नुकतेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी तिचे मत मांडले आहे.

एक्स बॉयफ्रेंडसोबत अजूनही चांगले नाते
अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही लवकरच ‘गुडबाय’ (Goodbye) या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, ती कोणत्याही पार्टीमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटली, तर तिचे रिऍक्शन काय असेल? या प्रश्नाचे उत्तर देत ती ‘नमस्ते’ म्हणाली. रश्मिका पुढे बोलताना म्हणाली की, “माझी एक्स बॉयफ्रेंडसोबत अजूनही चांगली मैत्री आहे. मला अजूनही त्याच्यासोबतच त्याच्या कुटुंबीयांना भेटायला आवडते.” रश्मिकाने हेदेखील मान्य करत म्हटले की, “ही खूप चांगली बाब नाहीये, पण माझे त्यांच्यासोबत चांगले नाते आहे. त्यामुळे हे चांगले आहे.”

रश्मिकाचा साखरपुडा
रश्मिका हिचे यापूर्वी अभिनेता रक्षित शेट्टी (Rakshit Shetty) याच्यासोबत साखरपुडा झाला होता. त्यांची 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किरिक पार्टी’ या सिनेमादरम्यान भेट झाली होती. त्यानंतर तिने अभिनेत्याला डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी जुलै 2017मध्ये साखरपुडाही केला होता. मात्र, दोघांनी सप्टेंबर 2018मध्ये आपला साखरपुडा मोडला. त्यानंतरपासून रश्मिकाचे नाव विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्यासोबत जोडले जात आहे. दोघेही ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ यासारख्या सिनेमात एकत्र झळकले होते. मात्र, दोघांनीही रिलेशनच्या बातम्यांचे खंडन केले आहे.

रश्मिकाचे सिनेमे
आता अभिनेत्री ‘गुडबाय’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, सुनील ग्रोव्हर आणि पावेल गुलाटी हे कलाकार दिसणार आहेत. याव्यतिरिक्त तिचे आणखी 2 हिंदी सिनेमे येणार आहेत. रणबीर कपूर याच्यासोबत ती ‘ऍनिमल’ या सिनेमात झळकणार आहे, तर सिद्धार्थ मल्होत्रासोबत तिचा ‘मिशन मजनू’ हा सिनेमा येणार आहे. याव्यतिरिक्त ती पुन्हा एकदा ‘पुष्पा 2’ या सिनेमात ‘श्रीवल्ली’च्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तुम्ही चिरंजीवी आणि रामसाठी माझे प्रेम विकत घेऊ शकत नाही’, पैसे ऑफर करणाऱ्या निर्मात्यावर भडकला सलमान
जरा इकडे पाहा! गर्लफ्रेंड सबा आजादसोबत ऋतिक रोशनला पाहून चाहते म्हणाले, ‘बाप-लेकीची जोडी…’

हे देखील वाचा