Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘कोणत्याही बोरिंग जेवणाला फक्त ठेचाच चव बदलू शकतो…’ विकी कौशलच्या जिभेला रुचलं मराठी जेवण

सुप्रसिद्ध अभिनेता विकी कौशल याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. खूप कमी वेळात त्याने इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री कॅट्रीना कैफ सोबत लग्न झाल्यारपासून तो जास्तच प्रसिद्धी झोतात आला आहे. मात्र सध्या तरी तो त्याचा आगामी येणारा चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा‘ मुळे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यावेळी तो मराठी वाहिणीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या‘ मध्ये हजेरी लावली होती.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध झोतात आलेला अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याचा आगामी येणारा चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Nam Mera) च्या प्रमोशनसाठी वेगवेगळया प्लॅटफॉर्मवर हजेरी लावत आहे. नुकतंच अभिनेता अमय वाघ (Amey Wagh) सोबत विकी देखिल ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये पाहायला मिळाला. त्यावेळेस त्याने महाराष्ट्रीयन जेवणाचे खूपच कौतुक केले असून त्याला ठेचा आणि बाकरी खायलाही आवडते.

विकी नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. त्यावेळेस त्याने सांगितले की, “मला चायनिज आणि जॅपनिज जेवणापेक्षा मालवाणी जेवण फार आवडतं, जगात अनेक लोक म्हणत असतील की, ते जेवण भारी आहे, हे जेवण भारी…पण माझ्या मते मालवाणी जेवण बेस्ट आहे. त्या शिवाय मला बाकरवाडी देखिल माझी आवडती आहे. मात्र, सर्वात जास्त फेवरेट म्हणजे ठेचा. कितीही बोरिंग जेवणाला फक्त तिखट ठेचाच  त्या जेवणाची पूर्ण चवच बदलूण टाकतो. अशा झुणकदार शब्दात त्याने मराठी जेवणाचे कौतुक केले आहे.

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाची निर्मिती करण जोहर (Karan Johar) याने केली असून शशांक खेतान (Shashank Khetan) यांनी दिग्दर्शन केले आहे. यामध्ये विकीसोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेंडणेकर (Bhumi Pendnekar) देखिल आहेत. हा चित्रपट (दि, 16 डिसेंबर) रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

अवघ्या 11 वर्षांच्या आदित्यची ‘बिग बीं’च्या शोमध्ये कमाल, पर्याय न वाचताच झटपट दिली प्रश्नांची उत्तरे
हे पाहिलं का? श्रीजीता अन् शालीन भानोतची मैत्री पाहून टीनाला अश्रू अनावर

हे देखील वाचा