Tuesday, May 21, 2024

‘तु मेरा है और मेरा ही रहेगा!’ शेहनाज गिलच्या भाषणाने भावूक झाले चाहते, पाहा व्हायरल व्हिडिओ

बिग बॉस 13‘ फेम पंजाबची कॅट्रीना कैफ बनून आलेली अभिनेत्री आता पूर्ण भारताची शेहनाज गिल बनली आहे. या कार्यक्रमामुळे शेहनाज गिल हे नाव प्रसिद्ध झालं आणि आज तिने आपल्या दमदार कामगिरीमुळे तिला ओळखलं जातं. ती सतत कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. शेहनाजला बिग बॉसने अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. ती सतत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन प्रेकांचे लक्ष वेधत असते. तिला नुकतंच ‘फिल्मफेअर मिडल ईस्ट अचीवर्स नाइट 2022’ मध्ये अवॉर्डने सन्मानित केले. तेव्हा तिच्या भाषणाने अनेक लोकांचे मनं जिंकले आहे.

नुकतात पार पडलेला सोहळा फिल्मफेयर मिडिल ईस्ट अचीवर्स नाइट 2022 (Filmfare Middle East Achievers Night 2022) मध्ये अभिनेत्री शेहनाज गिल (Shehnaz Gill) हिला देखिल अवॉर्ड देण्यात आला. तेव्हा तिने अवॉर्डबद्दल भावना व्यक्त करताना दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddhart Shukla) याच्या नावावर तिने अवॉर्ड केला त्याशिवाय अभिनेत्रीने त्याचे कौतुक केले. तिने भाषणामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या ज्यामुळे ती प्रेक्षकांची फेवरेट झाली आहे.

शेहनाजने अवॉर्ड सोहळ्यात दिलेले भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शेहनाजने भाषणामध्ये सांगितले की, “मी हा अवॉर्ड माझे कुटुंब आणि टीमला आजिबात डेडिकेट करणार नाही, कारण ही माझी मेहनत आहे. तिने अवॉर्डकडे बघत तिचा फेवरेट डायलॉग बोलते की, ‘तु मेरा है, और तु मेरा ही रहेगा.’ मी एका व्यक्तीची ऋणी आहे,धन्यवाद माझ्या आयुष्यामध्ये येण्यासाठी. त्याने माझ्यासाठी खूप इनवेस्ट केले आहे, ज्यामुळे मी आज इथपर्यत पोहोचले. सिद्धार्थ शुक्ला हे तुझ्यासाठी.”

 

View this post on Instagram

 

शेहनाजच्या अशा वक्तव्यानंतर तिने लाखो चाहत्यांचे मनं जिंकले आहेत. तिचा भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या व्हायर व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. एका युजरने लिहिले की, ‘मी रडने बंद नाही करु शकत…काश सिडभाऊ इथे असता, सिद्धार्थ भाऊ असता तर तिथेच बसलेला असता आणि जोरजोरात हसला असता. आनंदाने लाजले असता.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “ही खूपच भावनिक आहे.” एका अन्यने लिहिले की, “तो अजूनही तुमच्यासोबत आहे आणि गर्वाने तुमच्याकडे पाहात आहे.फक्त मेहनतीने पुढे जात राहा आणि सिडला गर्ववान करत राहा.”

चाहत्यांच्या या प्रेमळ कमेंटने दिसून येत आहे की, शेहनाज चाहत्यांची किती लाडकी आहे. तिचे सिद्धार्थवर प्रेम पाहूण अनेक प्रेक्षकांवर तिच्या लव्हस्टोरीने भुरळ घातली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीने वयाच्या 60व्या वर्षी थाटला संसार, सोशल मीडियावर मिळाले खरे प्रेम
तुषार बघायचा करीनाची 12-14 तास वाट, स्टारकिड असूनही केले हाेते दुर्लक्षित

हे देखील वाचा