Friday, May 24, 2024

विकी कौशलच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच झळकणार ‘या’ आगामी सिनेमात

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल याने अभिनेत्री कॅटरिना कैफ सोबत लग्न केल्यापासून तो सतत कोणत्याना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. त्याने बॉलिवूमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तो सतत आपल्या आपल्या भूमिकेमुळे ओळखला जातो. सध्या विकी आपला आगामी योणारा चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा’ मुळे चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा लग्नानंतर पहिल्यांदा चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्याचा आगामी येणारा चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा’ मध्ये अभिनेता मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विकीसोबत मुख्य भूमिकेत भूमी पेंडणेकर (Bhumi Pendnekar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियालवर नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करणायात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतानी (Shashank Khetani) यानी केला आहे. हा चित्रपट रोमांटिक आणि कॉमेडीने भरलेला असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. दिग्दर्शकाने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन आणि चित्रपट प्रदर्शनाची तारीख सांगूण प्रेक्षकांप्रती अत्सुकता वाढवली आहे. ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टार वर (दि, 16 डिसेंबर) रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

डिझनी प्लस हॉटस्टारच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे एकूण चार पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये विक्की, भूमी आणि कियारा दाखवले आसून तिथे लिहिले आहे की,’गोविंदा की कहानी, नहीं है ये आम कहानी।’ दुसऱ्या पोस्टरमध्ये कियारा आडवानी असून तिथे लिहिले आहे की, ‘ओ और कहो हाई हुकू विद सुकू।’ आणि तिसऱ्या पोस्टरमध्ये भूमी एक खुर्चीवर बसलेली दाखवली असून तिच्या हातामध्ये प्लेट दाखवली असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘गोविंदा नाम मेरा, नाचना काम मेरा, आ रहा हूं जल्द, अपनी कहानी लेकर।’

 

View this post on Instagram

 

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाप्रती उत्सुकता निर्माण झाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हही वाचा-
आहा कडकच ना! संजनाचा हटके अंदाज वेधतोय सर्वांचे लक्ष, फोटो गॅलेरी पाहाच
शालिन आणि एमसी स्टॅनच्या भांडणाने बिग बॉसच्या घराला बसला धक्का, ‘या’ अभिनेत्रीमुळे पेटली वादाची ठिणगी

हे देखील वाचा