Thursday, July 18, 2024

सव्वाशे कोटीत बनलेल्या ‘लायगर’ने धड 50 कोटीही नाही छापले, थिएटरमधील प्रेक्षकसंख्या पाहून भावूक झाला विजय

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा याचा ‘लायगर‘ हा सिनेमा 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमातून त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले. या सिनेमाचे त्याने जोरदार प्रमोशन केले होते. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राडा करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. मात्र, प्रेक्षकांची मने जिंकण्यात हा सिनेमा सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे आता सिनेमातील मुख्य अभिनेता विजय हा सिनेमाच्या खराब कामगिरीने खूपच निराश झालाये. अशात सिनेमाचे अपयश पाहून त्याची हैराण करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘लायगर’च्या अपयशाने विजय नाराज
जेव्हा ‘लायगर’ (Liger) या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, तेव्हा असे वाटले होते की, विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचेल. मात्र, प्रत्येक्षात भलतेच घडले. या सिनेमाला प्रेक्षकांची म्हणावी तशी पसंती मिळत नाहीये. त्यामुळे चित्रपटगृहात मोजकेच प्रेक्षक पाहायला मिळतायेत. अशात चित्रपटगृह मालकांवरही सिनेमाचे शो रद्द करण्याची नामुष्की ओढवत आहे.

यावर विजयने प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, विजय नुकताच त्याचा सिनेमा पाहण्यासाठी हैदराबाद येथील चित्रपटगृहात पोहोचला होता. मात्र, जेव्हा विजयने पाहिले की, चित्रपटगृहात प्रेक्षकांची संख्या खूपच कमीये, तेव्हा तो निराश झाला. सिनेमाचे हे प्रदर्शन पाहून त्याचे डोळे पाणावले आहेत.

बॉक्स ऑफिसवर सिनेमा सपशेल अपयशी
‘लायगर’ या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर खास कमाल करता आली नाहीये. या सिनेमाने पहिल्या दिवशी हिंदी पट्ट्यात 5 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. मात्र, यानंतर सिनेमाच्या कमाईचा आलेख उतरत्या क्रमाने जाताना दिसत आहे. सिनेमाने सोमवारी (दि. 29 ऑगस्ट) बॉक्स ऑफिसवर फक्त दीड कोटी रुपयांची कमाई केलीये. माध्यमांतील वृत्तांनुसार, 125 कोटीत बनलेल्या या सिनेमाने भारतात आतापर्यंत 36.7 कोटींची कमाई केलीये. यावरून असे म्हणणे वावगे ठरणार नाही की, विजयच्या ‘लायगर’ सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली नाहीये. या सिनेमात विजयव्यतिरिक्त अनन्या पांडे, राम्या कृष्णन आणि रोनित रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शॉकिंग! प्रसिद्ध गायिकेची गळा दाबून हत्या, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वयाच्या चाळिशीतही मलायका अरोराचा जलवा, फोटो पाहून हरपेल भान
अभिनेत्यांच्या एका चुकीमुळे करिलअरला बसला फटका! लिस्टमध्ये सामिल आहेत मोठमोठे कलाकार

हे देखील वाचा