Tuesday, July 23, 2024

अभिनेत्यांच्या एका चुकीमुळे करिलअरला बसला फटका! लिस्टमध्ये सामिल आहेत मोठमोठे कलाकार

बॉलिवूडच्या या झगमगणाऱ्या दुनियेत प्रत्येकजण आपली जागा बनवण्यासाठी धडपडत असतो. काही लोकांना हे कष्ट करावे लागत नाही, त्यांना सहजच काम मिळते. काहीजजनांचे तर बॉलिवूडमध्ये करिअर बनवणे हे स्वप्नच राहून जाते, आणि तिथेच आपले करिअर बनवणाऱ्यांना आपले करिअर सांभाळणे देखील कठिण जाते. तर आज आपण अशाच सेलिब्रिटींना जाणून घेउया की, यांच्या  एका चुकीमुळे त्यांनी स्वत:च्या पायावर दगड मारुन घेतला आणि करिअरला फुलस्टॉप दिला.  

शक्ती कपूर

या लिस्टमध्ये सगळ्यात आधी बॉलिवूडमध्ये कॉमेडी आणि खलनायकाच्या भुमिकेतून प्रसिद्धी मिळवणारे ‘शक्ती कपूर‘ (Shakti Kapoor) यांचे नाव येते. त्यांचे फिल्मी दुनियेतील करिअर सुरळीत चालले होते मात्र, त्यांच्या एका चुकीने त्यांना त्यांच्याच आयुष्याचे व्हिलन बनवले. या अभिनेत्याला कास्टिंग काउच या प्रकरणात फसले होते, शक्ती कपूर यांच्यावर एक स्टिंग ऑपरेशन केले गेल ज्यामध्ये ते दोषी ठरले आणि याचा फटका त्यांच्या करिअरवर पडला. यानंतर ‘शक्ती कपूर’ खूप कमी चित्रपटामध्ये काम कारताना दिसले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shakti Kapoor (@shaktikapoor)

 

विवेक ओबेरॉय

या लिस्टमध्ये ‘विवेक ओबेरॉय‘ (Vivek Oberoi) चेही नाव घेतले जाते. याने सलमानसोबत झालेल्या एका वादामुळे स्वत:च्या करिअरवर पाणी फेरले होते. विवेक आणि ऐशवर्या एका शुटिंगच्या दरम्यान जास्त जवळ आले होते आणि ऐश्वर्या सलमानची एक्स गर्लफ्रेंड असल्याने त्याने विवेक ओबेरॉयला त्रास दिला होता. त्यामुळे विवेकने प्रेस कॉनफरन्स बोलवून सलमान खानवर आरोप केले होते ज्यामुळे त्याला चित्रपटामध्ये काम मिळने बंद झाले होते. आता विवेक चित्रपटामध्ये आणि वेबसिरीजमध्य कमी दिसत असतो.

शाइनी आहुजा

शाइनी आहुजा‘ (Shiney Ahuja) याने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याने 2009 मध्ये आपल्या घरातील कामवाल्या बाईवर रेप केल्याचा आरोप लागल्याने त्याला 7 वर्षाचे कारावास भोगावे लागले. आता तो फिल्मी दुनिएपासून चार हात लांबच आहे.

अभिजीत भट्टाचार्य

अभिजीत भट्टाचार्य‘ (Abhijeet Bhattacharya) हे एक खूप चांगले सिंगर आहेत. त्यांनी शाहरुख खानच्या चित्रपटामध्ये जास्त गाणी दिले होते त्यामुळे त्यांना शाहारुख खानच्या आवाजाने ओळखले जात होते. मात्र, त्यांनी इंडस्ट्रीतील काही लोकांविरुद्ध भाष्य केल्याने त्यांना बॉलिवूडने काम देने बंद केले आणि त्यांच्या करिअरला फुलस्टॉप लागला.

अमन वर्मा

अमन वर्मा‘ (Aman Verma) याने टीव्ही पासून ते चित्रपटापर्यतचा प्रवास करुन आपले करिअर बनवले होते. त्याला खूप लोकप्रियता मिळाली होती, पण 2005 मध्ये अमन वर्मा याच्यावर एक स्टिंग ऑपरेशन केले ज्यामध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले. तेव्हापासून अमन वर्मा हा मेनस्ट्रीम चित्रपटापासून दूरच असतो.

गोविंदा

या लिस्टमध्ये ‘गोविंदा‘(Govinda) यांचे देखिल नाव  आहे. आज गोविंदा यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही, त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रामध्ये आपल्या दमदार अभिनयाने आणि डांन्सने आख्खं बॉलिवूड गाजवले होते. त्यांच्या डांन्सचे आणि डायलॉगचे आजही तेेवढेच चाहते आहेत. एकापेक्षा एक दमदार चित्रपट करनाऱ्या गोविंदाच्या एका चुकिच्या निर्णयामुळे त्याला करिअरशी तडजोड करावी लागली.  त्यांनी 2004 मध्ये राजकरणात जाण्याचा निर्णय केला ज्यामुळे चित्रपट दुनियेपासून  दुरावा निर्मान झाला. पण काही दिवसांनी चित्रपट दुनियेत परतल्याने त्यांना ह्वा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांचे चित्रपट चालले नाही. आता ते छोट्यामोठ्या कार्यक्रमात हजेरी लवत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा
भारताच्या विजयाचा अनन्या आणि आयुष्यमानने अशाप्रकारे घेतला आनंद,
मजेशीर व्हिडिओ व्हायरकेतकी चितळे फेसबूकवर सक्रिय होताच पहिलीच पोस्ट चर्चेत; म्हणाली,
‘निदान आता तरी…’लहान मुलाला सोडून काम केल्यामुळे ट्रोल झाली भारती सिंग, नेटकऱ्यांना दिले सडेतोड उत्तर

 

 

 

हे देखील वाचा