Thursday, July 18, 2024

शॉकिंग! प्रसिद्ध गायिकेची गळा दाबून हत्या, पोस्टमार्टममध्ये मोठा खुलासा

संगीतविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गुजराती गायिका वैशाली बलसारा हिची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शनिवारी (दि. 27 ऑगस्ट) मध्यरात्री तिच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. रविवारी (दि. 28 ऑगस्ट) वलसाडच्या पारडी येथील नदी किनारी एका कारमध्ये तिचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलीस गायिकेच्या महिला आणि पुरुष मित्रांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा फोन बंद लागत आहेत.

बेवारस कारमध्ये सापडला मृतदेह
वलसाड पोलिसांनी सोमवारी (दि. 30 ऑगस्ट) पोस्टमार्टम रिपोर्टनतंतर सांगितले की, लोकगायिका वैशाली बलसारा (Vaishali Balsara) हिची गळा दाबून हत्या (Vaishali Balsara Murder) करण्यात आली आहे. पोलीस हत्येमागील कारणांचा तपास करत आहेत. वैशाली शनिवारी तिच्या मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली होती. मध्यरात्री जवळपास 2 वाजता तिचा पती हरेश बलरासा याने वलसाड शहर पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रविवारी पोलिसांनी तपास सुरू केला.

वलसाड जिल्ह्याच्या पारडी पोलीस ठाण्याला पार नदीच्या जवळ एका बेवारस गाडीत महिला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे पोहोचून संशयास्पद कारची देखरेख केली असता, महिलेचा मृतदेह समोरच्या बाजूला पाय ठेवायच्या ठिकाणी पडल्याचे आढळले होते. हितेश बलसारा याने महिलेच्या मृतदेहाची पुष्टी करत सांगितले की, ती वैशाली बलसाराच आहे. वैशाली तिच्या पतीसोबत गुजरात, मुंबई आणि परदेशात स्टेज शो करत होती. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा करून तपासासाठी पाठवले आहेत.

गळा दाबून करण्यात आली हत्या
दुसरीकडे, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये वैशालीचा गळा दाबून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस वैशालीच्या मित्रांशी संपर्क साधत घटनेमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तिचे सर्व महिला आणि पुरुष मित्रांचे मोबाईल फोन बंद असल्याचे समजत आहे. पोलीस पैशांचा व्यवहार, अंतर्गत कलह, अवैध संबंध या सर्व बाजूंनी हत्येचा तपास करत आहेत, पण हत्येच्या कारणाबद्दल अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागलेला नाही.

विशेष म्हणजे, 31 डिसेंबर, 2022 रोजी नववर्षानिमित्त झालेल्या दारूच्या पार्टीतून पोलिसांनी वैशालीच्या घरी छापा मारला होता. तसेच, तिला आणि तिच्या मित्रांना नशेच्या स्थितीत ताब्यात घेतले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वयाच्या चाळिशीतही मलायका अरोराचा जलवा, फोटो पाहून हरपेल भान
अभिनेत्यांच्या एका चुकीमुळे करिलअरला बसला फटका! लिस्टमध्ये सामिल आहेत मोठमोठे कलाकार
बेबी बंप लपवण्यासाठी ‘कॅटने’ दाखवली ‘चालाकी’, पण सत्य आले बाहेर! खरंच ती प्रेग्नेंट आहे का?

हे देखील वाचा